पुुणे- जिल्ह्यातील मावळ परिसरात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होत आहे. हिवाळ्याची चाहूल लागताच परदेशी पक्षी याठिकाणी वास्तव्य करू लागले आहेत. असाच एक पक्षी सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनत आहे. त्याचे नाव आहे 'पट्ट कादंब'. हे पक्षी आशिया खंडात पाहण्यास मिळतात. मात्र, गुलाबी थंडीची चाहूल लागताच ते पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये परिसरात भ्रमण करण्यासाठी येतात.
पाहण्यास पर्यटक आणि पक्षी प्रेमींना मिळत आहेत. या वर्षी मावळ तालुक्यात काही भागात पट्ट कादंब या जातीचे पक्षी आढळून आले आहेत. हे पक्षी आशिया खंडातील मध्यवर्ती भागातून स्थलांतर करुन भारतात येतात. स्थलांतर प्रवासा दरम्यान हे पक्षी हिमालयातील पर्वतरांगा ओलांडून भारतात येतात. समुद्रसपाटी पासून सर्वांत उंच उडण्यारा पक्षी म्हणून याची ओळख आहे. पट्ट कदंब हा पक्षी आकाराने साधारणपणे 71 ते 76 CM इतका असतो.
या जातीचे पक्षी भारतात येतात....
159 प्रजातींचे पक्षी स्थलांतर करून भारतात येतात. त्यामधे थापट्या, नकटा, शेंडीबदक, लालसरी, थोरले व धाकटे मराल, तरंग, गडवाल, चक्रवाक ही बदके तसेच कादंब व पट्ट कादंब यांचा सामावेश आहे. तर चमचा, अवाक, तुतवार, शेकाट्या, कारंडव, उचाट, सोन चिलखा, कुरव असे पाणथळीचे पक्षीही हजेरी लावतात. तसेच गप्पीदास, कस्तुर, शंकर, धोबी, क्रौंच या पक्ष्यांबरोबरच दलदल ससाणा, शिक्रा, कवड्या हारिण, तीसा, श्येन कुकरी, खरुची हे शिकारी पक्षीही येतात.