ETV Bharat / state

अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याने आई-वडिलांवर गुन्हा दाखल - पुणे बातमी

जुलै महिन्याच्या अखेरीस मुलीच्या आई-वडिलांनी प्रवीण मते यांचे आई-वडील लहू मते व मंगल मते यांच्याशी चर्चा करून मुलगी अल्पवयीन आहे हे माहित असताना देखील तिचे लग्न प्रवीण सोबत ठरविले.

अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याने मुला-मुलीच्या आईवडीलांवर गुन्हा दाखल
author img

By

Published : Aug 28, 2019, 9:53 PM IST

पुणे - बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचे आई-वडिलांनी संगनमताने लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीच्या मामाने तक्रार दिल्यानंतर आई-वडील आणि नवऱ्या मुलाविरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर पोलिसांनी पुढील तपास उस्मानाबाद पोलिसांकडे वर्ग केला आहे.

अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याने मुला-मुलीच्या आईवडीलांवर गुन्हा दाखल

शिरुर तालुक्यातील कासारी येथे कामानिमित्त राहणाऱ्या दाम्पत्याने त्यांच्या 12 वर्षाच्या मुलीचे लग्न उस्मानाबाद येथील 24 वर्षीय मुलाशी महादेव मंदिरात लावून दिले. कासारी येथे कामानिमित्ताने राहणाऱ्या मुळच्या सोलापूर जिल्ह्यातील या दाम्पत्याची उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रवीण मते यांच्याशी ओळख झाली होती. त्यांनतर जुलै महिन्याच्या अखेरीस मुलीच्या आई-वडिलांनी प्रवीण मते यांचे आई-वडील लहू मते व मंगल मते यांच्याशी चर्चा करून मुलगी अल्पवयीन आहे हे माहित असताना देखील तिचे लग्न प्रवीण सोबत ठरविले. त्यांनतर कळंब, (जि.उस्मानाबाद) येथील महादेव मंदिरात दोघांचे लग्न त्यांच्या कोणत्याही नातेवाईकांना न सांगता लावून दिले. काही दिवसांपूर्वी नवविवाहित दाम्प्त्य हे मुलीचे आई-वडील राहत असलेल्या कासारी (ता.शिरूर) येथे राहण्यास आले. याकाळामध्ये प्रवीण याने मुलीच्या आई-वडिलांना काही पैसे उसने दिले होते. प्रवीण याने मुलीच्या आई-वडिलांना उसने पैसे दिल्याच्या कारणावरून मारहाण केली होती. मारहाण केल्याचा हा प्रकार या मुलीने तिच्या मामांना फोन करून सांगितला. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या मामाने शिक्रापूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून नवविवाहित मुला-मुलीच्या आई-वडिलांसह मुलीच्या पतीवर देखील गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलीचे मामांनी शिक्रापूर पोलिसांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. त्यांनतर शिक्रापूर पोलिसांनी तातडीने कासारी येथे जात अल्पवयीन मुलीसह तिची आई व पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मुलीचे आई आणि वडील, नवविवाहित मुलगा प्रवीण मते, मुलाचे वडील लहू रामा मते, आई मंगल लहू मते तिघे राहणार दहिफळ (ता. कळंब, जि.उस्मानाबाद) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा पोलीस स्टेशनकडे देण्यात आला आहे.

Intro:Anc__बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचे आईवडील व सासु सासरे व नातेवाईकांच्या संगनमताने लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली असुन पीडित मुलीच्या मामाने तक्रार दिल्यानंतर आई-वडील आणि नवऱ्या मुलाविरोधात शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर पोलिसांनी पुढील तपास उस्मानाबाद पोलिसांकडे वर्ग केला आहे.

शिरुर तालुक्यातील कासारी येथे कामानिमित्ताने राहणाऱ्या एका दाम्पत्याने त्यांच्या 12 वर्षीय मुलीचे लग्न उस्मानाबाद येथील 25 वर्षीय मुलाशी महादेव मंदिरात लावून दिले. कासारी येथे कामानिमित्ताने राहणारे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील हनुमंत कदम व सविता कदम यांची उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रवीण मते यांच्याशी ओळख झालेली होती. त्यांनतर जुलै महिन्याच्या अखेरीस हनुमंत कदम व सविता कदम या मुलीच्या आई वडिलांनी प्रवीण मते यांचे आई-वडील लहू मते व मंगल मते यांच्याशी चर्चा करून 12 वर्षाय मुलगी असल्याचे माहित असताना देखील तिचे लग्न प्रवीणसोबत ठरविले. त्यांनतर कळंब, (जि.उस्मानाबाद) येथील महादेव मंदिरात प्रियांका व प्रवीण यांचे लग्न त्यांच्या कोणत्याही नातेवाईकांना न सांगता लावून दिले. काही दिवसांपूर्वी नवविवाहित प्रवीण व प्रियांका हे मुलीचे आई वडील राहत असलेल्या कासारी (ता.शिरूर) येथे राहण्यास आले.याकाळामध्ये प्रवीण याने मुलीच्या आई वडिलांना काही पैसे उसने दिलेले होते. प्रवीण याने मुलीच्या आई वडिलांना उसने पैसे दिल्याच्या कारणावरून मारहाण केली होती. मारहाण केल्याचा हा प्रकार या मुलीने तिच्या मामांना फोन करून सांगितला.त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या मामाने शिक्रापुर पोलीसांत दिलेल्या तक्रारीवरून नवविवाहित मुला-मुलींच्या आई-वडिलांसह अल्पवयीन मुलीच्या पतीवर देखील गुन्हा दाखल केला आहे.

पिडित मुलीचे मामा विनोद भीमराव कोरडे (रा. गौर, ता.कळंब, जि.उस्मानाबाद) यांनी शिक्रापूर पोलिसांना घडलेली सर्व हकीगत सांगितली. त्यांनतर शिक्रापूर पोलिसांनी तातडीने कासारी येथे जात अल्पवयीन मुलीसह तिची आई व पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले,व अल्पवयीन मुलीचे वडील हनुमंत जनार्दन कदम व आई सविता हनुमंत कदम दोन्ही (रा.नारी, ता.बार्शी, जि.सोलापूर) सध्या रा.कासारी नवविवाहित मुलगा प्रवीण लहू मते, मुलाचे वडील लहू रामा मते, आई मंगल लहू मते तिघे राहणार दहिफळ (ता. कळंब, जि.उस्मानाबाद) यांच्यावर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा तपास उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा पोलीस स्टेशन येथे रवाना करण्यात आला आहे.Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.