ETV Bharat / state

Pune Crime : अल्पवयीन तरुणासोबत महिलेचे जबरदस्तीने शरीर संबंध; गुन्हा दाखल - तरुणाच्या कुटुंबीयांची पोलिसात धाव

कोरोना काळात पतीचे निधन झाल्यानंतर एका 28 वर्षीय महिलेने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाला धमकावून त्याच्याशी शरीर संबंध जोडले. एवढेच नव्हे तर त्या प्रसंगाचा अश्लील व्हिडिओ बनवला. तरुणाच्या कुटुंबीयांना हा प्रकार कळल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेऊन संबंधित महिलेविरुद्ध तक्रार दाखल केली. पुणे शहरात ही घटना घडली आहे.

Pune Crime
पुणे
author img

By

Published : Aug 21, 2023, 4:32 PM IST

अल्पवयीन तरुणाच्या लैंगिक शोषण प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याची प्रतिक्रिया

पुणे : शहरात आजपर्यंत बलात्कार तसेच विनयभंगाच्या अनेक तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. मात्र, पुण्यातील कोंढवा परिसरात चक्क एका अल्पवयीन तरुणाने त्याच्याशी एका महिलेने जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले असल्याची तक्रार दिली आहे. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाने या प्रकरणी तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका 28 वर्षीय महिलेविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल केला आहे.

'त्या' कृत्याची व्हिडिओ क्लिप केली तयार : याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, कोरोना काळात आरोपी महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. यानंतर तिने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन तरुणासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले होते. या महिलेच्या मोबाईलमध्ये दोघांच्या शरीर संबंधाची व्हिडिओ क्लिप सापडल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. पीडित अल्पवयीन तरुण आणि आरोपी महिला कोंढवा परिसरात राहतात. दोघेही एकमेकांचे शेजारी आहेत.

धमकावून जोडले शरीरसंबंध : कोरोना काळात या महिलेच्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर ही महिला एकटीच राहात होती. दरम्यान या महिलेने तरुणाविरुद्ध त्याने जबरदस्ती केल्याची खोटी तक्रार पोलिसात दिली आहे. यानंतर तिने अल्पवयीन तरुणाला धमकावणे सुरू केले आणि त्याच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. या संपूर्ण कृत्याची तिने मोबाईलमध्ये व्हिडिओ क्लिप देखील तरुणाला काढण्यासाठी भाग पाडली. मे 2021 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला आहे.

तरुणाच्या कुटुंबीयांची पोलिसात धाव : या महिलेच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारची अश्लील क्लिप असल्याचे पीडित तरुणाच्या कुटुंबीयांना समजले होते. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

पुण्यात यापूर्वीही अशा घटना घडल्या : एकट्या राहणाऱ्या महिलेकडून आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या तरुणाचे लैंगिक शोषण करण्यात आल्याच्या घटना नवीन नाही. यापूर्वीही अशा घटना उघडकीस आल्या आहेत. अशीच एक घटना मागील वर्षी पुणे शहरात घडली होती. ज्यामध्ये एका महिलेने शेजारी राहणाऱ्या युवकाला धमकावून त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यानंतर ती गर्भवती झाल्यावर तिने एका बाळाला जन्मही दिला. यानंतर त्या युवकाने पोलिसात तक्रार दाखल केली होती.

हेही वाचा:

  1. तरुणाचे लैंगिक शोषण-आत्महत्या; 'त्या' वसतीगृहाची मान्यता रद्द करण्याच्या हालचालिंना वेग
  2. Nagpur Crime News : गतिमंद आरोपीवर दुसऱ्या आरोपीकडून कारागृहातच लैंगिक अत्याचार; न्यायालयाचे चौकशीचे आदेश
  3. DRDO Director Pradeep Kurulkar News : हनीट्रॅपमध्ये अडकण्यापूर्वीचे प्रदीप कुरुलकरचे कारनामे, दोन महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोपपत्रात उल्लेख

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.