ETV Bharat / state

जून्नरमध्ये 'फ्लेमिंगों'चे आगमन; पक्षीप्रेमींना साद घालू लागली जलाशये..

author img

By

Published : Jul 7, 2019, 8:54 AM IST

Updated : Jul 7, 2019, 12:47 PM IST

मान्सूनची चाहूल लागताच ऑस्ट्रेलियातील फ्लेमिंगो पक्षांनी मढ खुबी खिरेश्वर व पिंपळगाव जोगा धरणाच्या जलाशयात आगमन केले आहे. त्यामुळे हे स्थळ आता पक्षीप्रेमींना साद घालत आहे.

गगणात भरारी घेताना ऑस्ट्रेलियातील फ्लेमिंगो पक्षी

पुणे- मान्सूनची चाहूल लागताच ऑस्ट्रेलियातील फ्लेमिंगो पक्षांचे थवे जून्नर तालुक्यातील मढ खुबी-खिरेश्वरसह पिंपळगाव जोगा धरण परिसरात दाखल होऊ लागले आहेत. तिन्ही ऋतुंमध्ये येथील वातावरण अल्हाददायक असल्याने फ्लेमिंगो पक्षी प्रतिवर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी भेट देतात. त्यामुळे हे स्थळ आता पक्षीप्रेमींना साद घालत आहे.

गगणात भरारी घेताना ऑस्ट्रेलियातील फ्लेमिंगो पक्षी

जुन्नर तालुक्याचा उत्तर व पश्चिम भाग हा सह्याद्री पर्वत रांगेनी व्यापला आहे. याच डोंगरांच्या कुशीत पिंपळगाव जोगा जलाशयाने एक वेगळे आकर्षण निर्माण केले आहे. विस्तीर्ण पसरलेला जलाशयाचा परिसर आता निसर्गाच्या विविध रंगाने फुलून गेला आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तीनही ऋतुंमध्ये परिसरातील वातावरण अल्हाददायक असते. याच वातावरणाचा आनंद घेण्यासाठी फ्लेमिंगो पक्षी या ठिकाणी दाखल झाले आहेत.

प्रति वर्षी २०० ते २५० फ्लेमिंगो पक्षांचा संघटीत थवा जलाशय परिसरात दाखल होतो. जलाशयावर मुक्तपणे विहार करणाऱ्या फ्लेमिंगो पक्षांचे दृश्‍य विलोभनीय दिसते. परिसरातील वातावरण पोषक मिळाल्याने आता त्यांचा मुक्काम अजून दोन महिने या परिसरात असण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पाहुण्यांची काळजी घेण्यासाठी येथील नागरिक सज्ज झाले आहेत.

Intro:Anc---परदेशी पव्हाण्यांची स्वारी आता ग्रामिण भागातही होऊ लागली,प्रामुख्याने ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्या फ्लेमिंगो रोहित पक्षाचे जुन्नर तालुक्‍यातील पिंपळगाव जोगा धरण परिसरातील मढ खुबी येथील खिरेश्‍वर येथे आगमन झाले आहे आकाशातुन गिरट्या घालणारे फ्लिमिंगो निसर्गाच्या सौदर्यात भर घालताना दिसत आहेत हा संपुर्ण नजारा ईटिव्हि भारतच्या कँमेरात कैद झालाय

Vo--खरं तर जुन्नर तालुक्याचा उत्तर व पश्चिम भाग हा मोठमोठ्या डोंगरांनी व्यापुन गेला याच डोंगराच्या कुशीत पिंपळगाव जोगा हा जलाशय मोठ्या दिमाखात उभा असुन अगदी लांबलचक असलेल्या या जलाशयाचा परिसर आता अगदी निसर्गाने फुलुन गेला आहे उन्हाळा,पावसाळा,हिवाळा तीनही ऋतुंमध्ये या परिसरातील वातावरण अल्हाददायक असतं याच वातावरणाचा आनंद घेण्यासाठी फ्लेमिंगो पक्षी या ठिकाणी दाखल होत निळ्या आकाशात पांढ-या शुभ्र ढगातुन सफर करताना पहायला मिळत आहेत

Vo--मान्सुनची चाहुल लागली कि फ्लेमिंगो रोहित पक्षी ऑस्ट्रेलियातून स्थलांतरित होऊन या मढ खुबी खिरेश्वर व पिंपळगाव जोगा धरणाच्या जलाशयात अगदी २०० ते २५० चा संघटीत थवा परिसरात दाखल होतो या पाहुण्याची काळजी घेण्यासाठी येथील नागरिक सज्ज असतात

Vo--जलाशयावर मुक्तपणे विहार करणाऱ्या या पक्षांचे दृश्‍य विलोभनीय दिसते ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्या फ्लेमिंगो पक्षांना पाहणे अस्मरणीय गोष्ट आहे या परिसरातील वातावरण पोषक मिळाल्याने आता हा त्यांचा मुक्काम अजुनही दोन महिने या परिसरात घालवतील 

End vo--परदेशातुन आलेले पव्हाणे या निसर्गाचा आनंद अगदी सुंदर अनुभवत आहे त्यांच्याही या आनंदात तुम्हीही सहभागी व्हाBody:Spl pkgConclusion:
Last Updated : Jul 7, 2019, 12:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.