ETV Bharat / state

Robotic Hand Surgery : राज्यात प्रथमच रोबोटिक हँडच्या मदतीने शस्त्रक्रिया, ससून रुग्णालयात झाला प्रयोग

author img

By

Published : Feb 8, 2023, 1:03 PM IST

पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून, रोबोटिक हँडच्यामदतीने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अशी शस्त्रक्रिया करणारे हे राज्यातील पहिले रुग्णालय असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Pune News
ससून रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया

पुणे : येरवडा येथील रहिवासी असलेल्या रवीकुमार चव्हाण या 22 वर्षीय तरुणावर रोबोटिक हँडच्या मदतीने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ससून रुग्णालयाच्या शैल्यचिकित्सा विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अमेय ठाकूर यांनी 45 मिनिटात ही शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेसाठी साधारण तास ते दीड तास लागतो परंतु रोबोटिक साह्याने 45 मिनिटात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आला. त्याचे परिणाम अधिक चांगले दिसून आले, तर रोबोटिक हँड साधन खरेदी करून पुढील शस्त्रक्रिया करण्यात येतील असे ठाकूर यांनी सांगितले.

रोबोटचा वापर : तंत्रज्ञानाचा वापर सर्वत्र होत असताना आता वैद्यकीय विभागातही रोबोटचा वापर सुरू झाला आहे. रोबोटिक हँड रुग्णावर वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करत आहेत. मात्र रोबोटला चालवणारा हा सर्जन असतो, तसेच रोबोटिक हँड खरेदीसाठी दहा ते वीस कोटी रुपये लागतात. त्याचा मेंटेनन्स, त्यसाठी स्वतंत्र खोली, कन्सोल रूम अशी व्यवस्था करावी, लागते एकंदरीत ही खर्चिक प्रक्रिया आहे. हा रोबोटिक हँड निर्माण करणारी ही खासगी कंपनी गुजरातमधील आहे. रोबोटिक हॅन्ड हे असे उपक्रम आहे. जे एक सॉफ्टवेअरचा प्रोग्राम असलेले साधन आहे. ते पिशवीत कुठेही घेऊन जाता येते. कारण तो केवळ एक यांत्रिक हात असतो, तो विजेवर चालतो. डॉक्टरांचा हात टाके घालण्यासाठी 360 अंशात फिरत नाही. मात्र हे काम हा रोबोटिक हँड सहजपणे करतो. त्यामुळे रुग्णाची शस्त्रक्रिया लवकर होते. अशी माहिती मेरी कंपनीचे अभिजीत भावसार यांनी दिली आहे.

शस्त्रक्रियेचे फायदे : या शस्त्रक्रियेचे फायदे असे आहेत की शस्त्रक्रिया करताना टाके टाकण्यासह विविध साधने असतात जी किचकट असतात. ते शस्त्रक्रिया दरम्यान बदलता येतात. सर्जनला सहजपणे शस्त्रक्रियेस मदत होते. थकवा येत नाही. वेळेची बचत होते, शस्त्रक्रियेत अधिक अचूकता येते. महिनाभर या रोबोटिक हँड साधनाचा वापर करून शस्त्रक्रिया करण्यात येईल. त्याचे परिणाम योग्य दिसल्यास सामाजिक उत्तर दायित्व निधीतून ते ससून रुग्णालयातील रुग्णांसाठी खरेदी करण्यात येईल असे डॉक्टर संजीव ठाकूर अधिष्ठता ससून रुग्णालय यांनी सांगितलेला आहे.

हेही वाचा : Ambadas Danve on Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला, अंबादास दानवे यांचे पोलीस महासंचालकांना पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.