ETV Bharat / state

Pizza ATM Pune : भारतातील पहिले पिझ्झा एटीएम पुण्यात सुरू - भारतातील पहिले पिझ्झा एटीएम पुण्यात सुरू

भारतातील पहिले पिझ्झा एटीएम पुण्यात बनवण्यात आले आहे. ( First Pizza ATM in Pune ) धैर्य शहा या तरुणाने हे एटीएम तयार केले आहे. या मशीनद्वारे लोकांना हवा तेव्हा आपल्या आवडीचा पिझ्झा निवडता येऊ शकतो.

First Pizza ATM Start in Pune
भारतातील पहिले पिझ्झा एटीएम मशीन पुण्यात
author img

By

Published : Jan 29, 2022, 12:19 PM IST

पुणे - आजपर्यंत आपण अनेक प्रकारचे एटीएम पाहिले असतील. मात्र, भारतातील पहिले पिझ्झा एटीएम पुण्यात बनवण्यात आले आहे. ( First Pizza ATM in Pune ) धैर्य शहा या तरुणाने हे एटीएम तयार केले आहे. पिझ्झा एटीएम मशीनच्या माध्यमातून त्याने आपला व्यवसाय सुरू केला आहे.

याबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतलेला आढावा

एटीएमची संकल्पना -

या मशीनद्वारे लोकांना हवा तेव्हा आपल्या आवडीचा पिझ्झा निवडता येऊ शकतो. फक्त तीन मिनिटात हा पिझ्झा लोकांना खाण्यास उपलब्ध होईल. ( Pizza in just 3 minutes through ATM ) धैर्य हा आयटी इंजिनिअर आहे. मात्र, खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये आवड असल्यामुळे या पिझ्झा मशीनचे विचार सुचला. पैशाचे एटीएम आहे. पाण्याचेही एटीएम आहे. मात्र, खाद्यपदार्थांचे एटीएम आपल्या इथे नाही. यामुळे त्याला खाद्यपर्दार्थाचे एटीएम बनविण्याची कल्पना सुचली.

यानंतर त्याने चंदीगड येथून हे विशेष पिझ्झा एटीएम ( Pizza ATM Made from Chandigarh ) मशीन बनवून घेतले. हे मशीन सुरू करून फक्त 20 दिवस झाले आहे आणि लोकांचा याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पुण्यातील कुमार पॅसिफिक मॉल येथे हे पिझ्झा मशीन उपलब्ध आहे.

हेही वाचा - Sanjay Raut On Devendra Fadnavis : संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा; म्हणाले, "भाजपा सरकारने दारुची होम डिलिव्हरी..."

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.