पूणे - राजगुरुनगरजवळील चांडोली येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास भंगारच्या गोदामाला आग लागण्याची घटना घडली. यामध्ये गोदामातील साहित्य जळून खाक झाले आहे. राजगुरुनगर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांना चार तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
या घटनेत भंगार जळाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे भंगार गोदाम बंद होते. गोदामावर गेलेल्या विद्युत वाहिनीवरील पक्ष्यांमुळे शॉटसर्किट होऊन गोदामात आग लागली, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अगदी काहीच वेळातच धुराच्या लोटासह आग वाढली. राजगुरुनगर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी चार तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेचा महसुल विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे.