ETV Bharat / state

PUNE MIDC FIRE LIVE : प्राथमिक अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई - गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील - पिरंगुट औद्योगिक वसाहतीमधील कंपनीला भीषण आग

HOME MINISTER DILIP VALSE PATIL WITH MEDIA
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
author img

By

Published : Jun 7, 2021, 7:13 PM IST

Updated : Jun 8, 2021, 2:16 PM IST

12:00 June 08

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी साधलेला संवाद

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची घटनास्थळी भेट

11:44 June 08

माध्यमांशी संवाद साधताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घटनास्थळी भेट

09:11 June 08

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची माहिती

डीएनए चाचणीनंतर मृतदेह नातेवाईंकाच्या ताब्यात देण्यात येणार - पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची माहिती

08:44 June 08

ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतलेला आढावा

पुणे - मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस या कंपनीला काल (सोमवारी) दुपारी भीषण आग लागली. या आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. तर काल दुपारी लागलेली आग ही अजूनही आटोक्यात आली नाही. कंपनीतील काही भागात अजूनही आग सुरूच आहे. कंपनीत अजूनही काही रासायनिक पदार्थ असल्याने आग पुन्हा पेटत आहे. या परिस्थितीत घटनास्थळावरुन ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतलेला आढावा.

22:39 June 07

मृतांच्या नातेवाईकांसोबत साधलेला संवाद

मृतांच्या नातेवाईकांसोबत साधलेला संवाद

पुणे - मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस या कंपनीला आज (सोमवार)दुपारी लागलेल्या भीषण आगीत १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. यातील मृतांच्या नातेवाईकांसोबत ई टीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी साधलेला संवाद.....

22:23 June 07

मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांकडून प्रत्येकी दोन लाखांची मदत

  • महाराष्ट्रात पुण्यातील कारखान्यात लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहानीमुळे अंतःकरणाला वेदना होत आहेत. मृतांच्या कुटुंबांप्रती शोकभावना

    — Narendra Modi (@narendramodi) June 7, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पुणे - मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस या कंपनीला आज (सोमवार)दुपारी लागलेल्या भीषण आगीत १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. १९ कामगारांना वाचवण्यात यश आले असून, यामध्ये काहीजण गंभीर जखमी झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच, या दुर्घटनेबाबत दुःख देखील व्यक्त केले आहे.

22:22 June 07

आगीत मृत्यू झालेल्यांची नावे

fire
आगीत मृत्यू झालेल्यांची नावे पुढील यादीत मार्क केली आहेत

पुणे - या आगीत मंगल नागु आखाडे (खरावडे), सीमा बोराटे (बीड), संगीता गोंदे (मंचर), सुमन ढेबे (खरावडे), संगीता पोळेकर (घोटावडे फाटा), महादेवी अंबारे (सोलापूर), सारिका विलास कुदळे, सुरेखा तुपे (करमोळी) यांचा मृत्यू झाला आहे. 

22:21 June 07

अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांसोबत साधलेला संवाद

पुणे - मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस या कंपनीला आज (सोमवार)दुपारी लागलेल्या भीषण आगीत १८ कामगारांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात अग्निशामक दलाच्या जवानांशी प्रतिनिधी राहुल वाघ यांनी साधलेला संवाद....

21:08 June 07

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

पुणे -  पिरंगुट येथील एका रासायनिक कंपनीला आग लागली होती. यात 18 कामगारांचा मृत्यू झाला आहे. आगीतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

20:42 June 07

आग पूर्णपणे आटोक्यात नाही, नंतरच आगीचे कारण स्पष्ट होईल - पोलीस

माहिती देताना पोलीस अधिकारी

पुणे - सध्या ही आग पूर्णपणे आटोक्यात आली नसून, ती विझवण्याचे काम अग्निशामक दलाकडून सुरू आहे. यानंतरच ही आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले. पूर्ण माहिती घेतल्यानंतरच कारवाईबाबरचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. 

20:19 June 07

आग आटोक्यात, कुलिंगचे काम सुरू

आग आटोक्यात आली

पुणे - पिरंगुट एमआयडीसी परिसरात असलेल्या एका कंपनीला आग लागली होती. यात 17 कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, या कंपनीला लागलेली आग सध्या आटोक्यात आली असून, सध्या कुलिंगचे काम सुरू आहे. घटनास्थळी पोलीस, अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले आहेत.

19:53 June 07

मृतांचा आकडा 17 वर, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

पिरंगुटमधील कंपनीला आग

पुणे - पिरंगुट एमआयडीसी परिसरात असलेल्या एका कंपनीला आग लागून 17 कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. 

19:52 June 07

19:25 June 07

कुलिंगचे काम सुरू; 15 कामगारांचा मृत्यू

प्रतिनिधींनी घटनास्थळावरून घेतलेला आढावा

पुणे - पिरंगुट एमआयडीसी परिसरात असलेल्या एका कंपनीला आग लागून 15 कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. पिरंगुटजवळ असलेल्या उरवडे येथील SVS AquaTechnologies या कँपनीत ही आगीची घटना घडली आहे. आग लागली त्यावेळी कँपनीत 37 कामगार होते अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या

सोमवारी दुपारी ही आग लागली. त्यावेळी 37 कामगार कंपनीत होते अशी प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, कंपनीत आग लागली आणि काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीमुळे प्रचंड धुराचे लोट परिसरात पाहायला मिळत होते. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दल तसेच पीएमआरडीएचे बंब घटनास्थळी दाखल झालेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, कुलिंगचे काम सुरू आहे. मात्र, या घटनेत 15 कामगारांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

19:19 June 07

15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

पुणे - पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीतील एसव्हीएस या कंपनीला भीषण आग लागली आहे. या कंपनीत सॅनिटायझर बनवण्याचे काम सुरू होते. या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.  

18:59 June 07

मुळशी तालुक्यातील पिरंगुट (pune fire news) येथील औद्योगिक वसाहतीतील एसव्हीएस या कंपनीला भीषण आग लागली आहे.

पुणे - मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीतील एसव्हीएस या कंपनीला (pune fire news) भीषण आग लागली आहे. या कंपनीत सॅनिटायझर बनवण्याचे काम सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे.  

चिंताजनक बाब म्हणजे या कंपनीत काही कामगार अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या कंपनीत अन्य केमिकल्स देखील तयार केले जात आहेत. याच केमिकल्समुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर देखील पसरला आहे

Last Updated : Jun 8, 2021, 2:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.