पुणे (बारामती) - गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी बारामतीत दोघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र सर्जेराव भंडलकर (वय २४, रा.कोऱ्हाळे बुद्रुक.ता.बारामती), प्रतिक भालचंद्र शिंदे( वय २५.रा. हरिकृपा नगर इंदापूर रोड.ता. बारामती ) अशी गुन्हे दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
बारामतीत गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल शहराच्या हद्दीत बारामती नीरा रस्त्यावर पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार व गुन्हे शाखेचे कर्मचारी गस्त घालीत असताना, राजेंद्र भंडलकर हा मोटर सायकल ( एम.एच.१२, एफ.जे, ३३३०) वर संशयितरित्या फिरत असताना आढळून आला. त्यास हात दाखवून थांबविण्याचा प्रयत्न केला असता, त्याने भरधाव वेगात मोटरसायकल निरा रोड म्हसोबा मंदिराच्या शेजारी टाकून पळून जात असताना त्यास पकडले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली त्याच्या कमरेला गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंंत काडतुसे आढळून आली. त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता, सदरचे पिस्तूल हे प्रतिक शिंदे याचे असल्याचे सांगितले. त्यानुसार त्याच्या घराची झडती घेतली असता, एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल मिळून आले. पोलिसांनी पंचनामा करून १ लाख ६० रुपये किंमतीच्या दोन गावठी पिस्तूलासह दोन जिवंत काडतूस ताब्यात घेतली आहेत.
बारामतीत गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल ही कामगिरी अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले, योगेश शेलार, सहाय्यक फौजदार संदिपान माळी, पो.ना ओंकार सिताप, पो.कॉ पोपट नाळे यांच्यासह अन्य पोलिसांनी केली.
बारामतीत गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल