ETV Bharat / state

शिरोली ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचांचा वाढदिवस साजरा; गुन्हा दाखल

author img

By

Published : Aug 6, 2020, 3:03 PM IST

जया दसगुडे यांची शिरोली ग्रामपंचायतीवर उपसरपंचपदी निवड झाली होती. त्यांचा 23 जुलैला वाढदिवस होता. हा वाढदिवस ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामविकास आधिकारी यांनी ग्रामपंचायत कार्यालयात केक कापून साजरा केला. यावेळी मास्क न वापरणे, सोशल डिस्टसिंगचे नियम न पाळतात वाढदिवस साजरा केल्याने गावात चर्चेचा विषय ठरला होता.

fir on shiroli upsarpunch for birthday celebration in grampanchayat office

राजगुरुनगर (पुणे) - खेड तालुक्यातील शिरोली गावावर कोरोना महामारीचे गंभीर संकट असून 10 रुग्णांची भर पडली आहे. अशावेळी सोशल डिस्टसिंगचे नियम धाब्यावर लावत गावच्या महिला उपसरपंचाचा वाढदिवस ग्रामपंचायत कार्यालयात धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. याप्रकरणी राजगुरुनगर पोलिसांत कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जया काळुराम दसगुडे, असे उपसरपंचाचे नाव आहे.

मागील दोन महिन्यांपूर्वी जया दसगुडे यांची शिरोली ग्रामपंचायतीवर उपसरपंचपदी निवड झाली होती. त्यांचा 23 जुलैला वाढदिवस होता. हा वाढदिवस ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामविकास आधिकारी यांनी ग्रामपंचायत कार्यालयात केक कापूून साजरा केला. यावेळी मास्क न वापरणे, सोशल डिस्टसिंगचे नियम न पाळताच वाढदिवस साजरा केल्याने गावात चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे माजी उपसरपंच मोहन वाडेकर यांनी गटविकास अधिकारी व पोलीस निरिक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची तपासणी करुन वाढदिवसाच्या कार्यक्रमात सोशल डिस्टसिंग व मास्क न वापरणे या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावावर कोरोना महामारीचे संकट असताना गावचे लोकप्रतिनिधी व आधिकारीच जर नियमांचे उल्लंघन करत स्व:तचे वाढदिवस ग्रामपंचायत कार्यालयात साजरे करत असल्याने संपूर्ण गावात संताप व्यक्त केला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.