ETV Bharat / state

Nirmala Sitharaman : देश वेगाने बदलतोय, 2047 पर्यंत भारत विकसित देश बनेल - अर्थमंत्री निर्मला सीतारमण - Nirmala Sitharaman on Indian Economy

दौंड तालुक्यातील पाटस येथे भाजपाच्यावतीने मतदारांशी संवाद कार्यक्रमाचे (bjp Communication program with voters) आयोजन केले होते. यावेळी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण ( Nirmala Sitharaman daund visit) यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना 2047 पर्यंत भारत विकसित देश बनेल. तसेचं, दौंडमधील रस्तेही मोठ्या प्रमाणात विकसीत होतील. अस निर्मला सीतारामन म्हणाल्या.

central finance minister nirmla sitaraman
2047 पर्यंत भारत विकसित देश बनेल - निर्मला सीतारामन
author img

By

Published : Sep 24, 2022, 3:52 PM IST

Updated : Sep 24, 2022, 10:47 PM IST

दौंड (पुणे): दौंड तालुक्यातील पाटस येथे भाजपाच्या वतीने मतदारांशी संवाद कार्यक्रमाचे (bjp Communication program with voters) आयोजन केले होते. यावेळी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण ( Nirmala Sitharaman daund visit) यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना 2047 पर्यंत भारत विकसित देश बनेल. देशाची अर्थव्यवस्था येणाऱ्या 25 वर्षांत मोठी उंची गाठेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त ( Nirmala Sitharaman on Indian Economy ) केला. तसेचं, दौंडमधील रस्तेही मोठ्या प्रमाणात विकसीत होतील. येणारा काळ देशासाठी अमृत काळ आहे. अस निर्मला सीतारमण म्हणाल्या.

दौंडचे राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे संबंधीचे सर्व प्रश्न सोडवणार - सीतारमन दौंड आणि परिसरातील राष्ट्रीय महामार्गासंबंधीचे, रेल्वेसंबंधित (Ministry of Railways India) प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. संबंधित खात्यांचे मंत्री या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या संवाद कार्यक्रमात तुमच्या सर्व समस्या मी ऐकून घेतल्या आहेत. तरीही मी दिल्लीला गेल्यानंतर संबंधीत खात्याच्या मंत्र्यांना सर्व समस्या तातडीने सोडवण्यासाठी सांगणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. पुढे बोलताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, भाजपाचे नेते जनतेच्या कायम संपर्कात असतात. यामुळे सर्वसामान्यांच्या समस्या सोडवल्या जातात. सर्वसामान्यांना छोट्या मोठ्या समस्या असतील किंवा काही अडचणींबाबत सूचना आल्या तर या समस्या सोडवणे आवश्यक असते. यामुळे आज येथे मांडण्यात आलेल्या सर्व समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

2047 पर्यंत भारत विकसित देश बनेल - निर्मला सीतारामन

या कार्यक्रमात दौंडचे आमदार राहुल कुल (MLA Rahul Kul) यांनी बोलताना सांगितले की, पुणे-दौंड रेल्वे (Pune-Daund Railway) प्रत्येक तासाला सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गासंबंधित समस्या केंद्रीय मंत्र्यांना सांगीतल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून येथील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती दिली. परिसरातील पाणी समस्या सोडवण्यासाठी मुळशीचे पाणी वळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी देवेंद्र फडणवीसांचे सहकार्य मिळत आहे. येथील अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. पाणी समस्या कायमस्वरूपी मिटली तर येथे वेगाने विकास होणार आहे. दौंड तालुक्यात जिल्हा न्यायालय सुरू करण्यात येणार आहे. प्रांत कार्यालय सुरू होणार असल्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.

कार्यक्रमावेळी दौंडचे आमदार राहुल कुल, राम शिंदे, हर्षवर्धन पाटील, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे, भाजपाच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्ष कांचन कुल, जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, बाळासाहेब गावडे, तानाजी थोरात, दौंड तालुका अध्यक्ष माऊली ताकवणे, बापू भागवत आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ हर्षदा वासुदेव काळे, वकील हितेंद्र शहा, डॉ राजेश दाते यांसह अनेक डॉक्टर आणि वकिलांनी आपले म्हणणे तसेच व्यवसायाबाबतच्या समस्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या समोर मांडल्या.

Last Updated : Sep 24, 2022, 10:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.