ETV Bharat / state

अल्पवयीन मुलीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल - Baramati minor girl suicide

बारामती तालुक्यातील बाबुर्डी गावात २४ ऑक्टोबरला एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली होती. याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

police station
पोलीस स्टेशन
author img

By

Published : Oct 30, 2020, 10:39 PM IST

बारामती - तालुक्यातील बाबुर्डी येथील अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मृत मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विशाल युवराज पोमणे (रा, बाबुर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

बारामती तालुक्यातील बाबुर्डी येथील १७ वर्षीय मुलीने २४ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. फिर्यादीत नमूद केल्यानुसार आरोपी विशाल पोमणे हा वारंवार मुलीच्या घरी येत तिच्याशी बोलून तिला त्रास देत होता. तसेच व्हाट्सअ‌ॅप वर मॅसेज करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर तिने घरातील लोखंडी रॉडला ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.