ETV Bharat / state

Abdul Sattar : 'कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करा' - State Congress youth general secretary

कृषी मंत्री अब्दुल सत्तार ( Agriculture Minister Abdul Sattar ) यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील ( Congress Youth General Secretary ) यांनी केली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 26, 2022, 7:39 PM IST

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करा

पुणे : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार ( Agriculture Minister Abdul Sattar ) यांनी सिल्लोड महोत्सवासाठी कृषी खात्याला पाच कोटी रुपये वर्गणी गोळा करण्याचे तोंडी आदेश दिले असल्याचे वृत्त आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील ( Congress Youth General Secretary ) यांनी पुणे पोलिस आयुक्त ( Pune Police Commissioner ) यांच्याकडे केली आहे.

पैसे जमा करण्याचे कृषीमंत्र्यांचे आदेश - प्रसार माध्यमांना माहिती देताना रोहन सुरवसे पाटील म्हणाले की, १ ते १० जानेवारी दरम्यान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघ असलेल्या सिल्लोड महोत्सव आयोजित करण्यात आला असून या महोत्सवासाठी कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना कोठ्यावधी रुपयाची वर्गणी जमा करण्याचे आदेश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्याने कृषी विभागात खळबळ उडाली आहे.

पैसे गोळा करण्याचे तोंडी आदेश - कृषी महोत्सवात प्रवेश व्हीआयपी प्रवेशासाठी चार प्रकारचे पासेस तयार करण्यात आले असून प्लॅटिनम साठी पंचविस हजार, डायमंडसाठी पाच हजार, गोल्डसाठी दहा हजार, सिल्वर प्रवेशिकेसाठी पाच हजार रुपये असे चार प्रकारचे प्रवेशिका कृषी विभागाकडून सर्व जिल्हा कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात पाठवल्या आहेत. या प्रवेशिका प्रत्येक तालुका कृषी अधिकारी मार्फत तालुक्यातील खते, किडकनाशी बियाणे विक्रेत्यांना द्यायचे आहेत. त्या बदल्यात पैसे गोळा करून त्या कार्यालयाकडे जमा करण्याचे तोंडी सूचना दिले असल्याची माहिती मिळत आहे.

मंत्र्याच्या आदेशाने खळबळ - अब्दुल सत्तार यांनी कोट्यावधी रुपये कृषी महोत्सवासाठी मागितल्याने कृषी आयुक्तालयात खळबळ उडाली असून, सदर बाब अतिशय गंभीर असून कृषि मंत्री यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे.म्हणून सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.