पुणे : पुण्यामध्ये दिल्लीतून आलेल्या एका सामाजिक महिला कार्यकर्त्यावर बलात्कार करण्यात आला ( rape incidents Increase in Pune ) आहे. या महिलेला राहण्यासाठी घर भाड्याने हवे होते. घर शोधत असताना आरोपी संजय बाबुराव भोसले याने घर भाड्याने दाखवण्यासाठी महिलेला एका प्लॉटमध्ये घेऊन गेला. त्या ठिकाणी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडलेली (Female social worker raped at gunpoint ) आहे.
महिला सामाजिक कार्यकर्ता : दिल्लीतील महिला सामाजिक कार्यकर्ता पुण्याजवळ असलेल्या उरुळी कांचन येथील निसर्ग उपचार केंद्रात ( Naturopathy Center Urli Kanchan ) उपचारासाठी आल्या होत्या. त्यांना राहण्यासाठी भाड्याने रूम पाहिजे होती. रूमची चौकशी करत असताना संजय बाजीराव भोसले यांनी त्यांना रूम दाखवण्याचा बहाणा करत. हडपसरमधील एका प्रसिद्ध सोसायटीत घेऊन गेला आणि त्या ठिकाणी बलात्कार केला आहे. बलात्कार प्रकरणी पुण्यातील हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रूम दाखवण्याचा बहाणा : पुण्यामध्ये वाढते गुन्हेगारीकरण होत असतानाच कौटुंबिक हिंसाचार बलात्काराच्या ( domestic violence incidents Increase in Pune ) घटना सुद्धा मोठ्या प्रमाणात घडत आहेत. पुणे शहर हे एक जागतिक शहर असल्यामुळे या ठिकाणी पूर्वी नोकरीसाठी लोकं ज्या मोठ्या प्रमाणात येत होते. त्याच प्रमाणामध्ये आता या शहरांमध्ये आधुनिक उपचार पद्धती भेटत आहेत. म्हणून अनेक लोक उपचार घेण्यासाठी येत असतात.
पुण्यातील आरोग्य सेवा परवडणाऱ्या : पुण्यामधील वाढत्या आरोग्य सेवा या लोकांना परवडणाऱ्या आहेत. त्यामुळे पुण्यामध्ये येऊन उपचार घेण्यासाठी बऱ्याच लोकांची पसंती असते. गेल्या पाच सहा वर्षांमधून पुण्यामध्ये वैद्यकीय उपचारासाठी देशातल्या वेगवेगळ्या भागांमधून लोक येतात. एक दिल्लीतील सामाजिक कार्यकर्ता महिला जी पुण्यातील उरळी कांचन भागामध्ये एक निसर्गोपचार केंद्र आहे. त्या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येणार होती. ते उपचार घेण्यासाठी त्यांना काही दिवस पुण्यामध्ये राहावे लागणार होते.
रिअल इस्टेट एजंटशी विचारणा : या महिलेने तिथे एक रिअल इस्टेट एजंट याच्याशी विचारणा ( Real estate agent rape woman ) केली. त्या एजंटने रूम दाखवण्याच्या बहानाने त्या महिलेला एका ठिकाणी चांगल्या मोठ्या सोसायटीमध्ये घेऊन जाऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडलेली आहे. त्या ठिकाणी नेल्यानंतर त्या महिलेला पिस्तूल दाखवून या व्यक्तीने बलात्कार केल्याची तक्रार हडपसर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आले. त्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुण्यात हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक पोलीस करीत आहेत.