पुणे: याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील येरवडा परिसरातील सुभाष नगर येथे मोरे दाम्पत्य राहते. संदीप विष्णू मोरे आणि भाग्यश्री विष्णू मोरे हे पती-पत्नी आहेत. संदीप मोरे 28 तारखेला रात्री 11 च्या दरम्यान दारू पिऊन घरी आला होता. त्याने पत्नीला मटन करण्याबाबत विचारले. परंतु, तिने नकार दिल्याने तो चिडला आणि त्याने पत्नी भाग्यश्रीच्या डोक्यात विळ्याने वार केले. घटनेनंतर पत्नीला गंभीर जखमी अवस्थेत एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू आहेत. या संदर्भात आरोपी पती संदीप मोरे विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ: पुण्यामध्ये कौटुंबिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. संसार हा दोघांचा असला तरी त्याचा सगळ्यात जास्त त्रास महिलांना होताना दिसत आहे. शेवटी समाजव्यवस्था ही कौटुंबिक व्यवस्थेतून निर्माण होत असते. त्यामुळे महिला अत्याचार थांबणे गरजेचे आहे.
नोकरी करते म्हणून बायकोवर हल्ला: बायकोला नोकरी करण्यास मनाई केल्यानंतरही ती ऐकत नसल्याने नवऱ्याने तिच्यावर चाकूहल्ला केला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. ही घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिम भागातील शहाडमधील ओम कृष्ण पुरम सोसायटीच्या गेटवर 12 मे रोजी घडली आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हल्लेखोर नवऱ्यावर विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शशिकांत पांडुरंग शेट्टी (वय ४५ वर्षे, रा. वायलेनगर कल्याण) असे नवऱ्याचे नाव आहे. तर रंजिता (वय ३८ वर्षे) असे जखमी बायकोचे नाव आहे.
नोकरी ठरली वादाचे कारण: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर नवरा शशिकांत हा कल्याण पश्चिम भागातील वायलेनगर मधील वेदांत सोसायटीत राहतो. त्याच्या पहिल्या बायकोचे निधन झाल्याने तीन महिन्यापूर्वीच त्याने रंजितासोबत दुसरे लग्न केले. तसेच रंजिताच्याही पहिल्या नवऱ्याचे निधन झाले आहे. ती ही मुबंईतील विद्याविहार भागात असलेल्या 'इंडिया हेल्थ इन्शुरन्स' कंपनीत नोकरीला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून दोघा नवरा-बायकोमध्ये नोकरी करण्यावरून वाद होत होते. याच वादातून बायकोने नवऱ्याचे घर सोडले. ती शहाडमधील ओम कृष्ण पुरम सोसायटीत राहणाऱ्या आपल्या आईकडे राहून नोकरीच्या ठिकाणी जात होती.
हेही वाचा: