ETV Bharat / state

पुणे : टाळेबंदीमुळे सामान्य कलाकार बेहाल, मागण्यांसाठी उपोषणाचा मार्ग - पुणे उपोषण बातमी

टाळेबंदीमुळे कलाकार व बॅकस्टेज मंडळींवर उपासमारीची वेळ आली असून सरकारने याकडे लक्ष देत मदत करावी, यासह अन्य मागण्यांसाठी कलाकारांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

उपोषणकर्ते
उपोषणकर्ते
author img

By

Published : Sep 16, 2020, 9:33 PM IST

पुणे - टाळेबंदीमुळे सहा महिन्यांपासून सांस्कृतिक कार्यक्रम बंद आहेत. याचा मोठा परिणाम कलाकार आणि इतर बॅक स्टेज मंडळींवर झाला आहे. या सामान्य कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे विविध मागण्यासाठी बुधवारी (दि. 16 सप्टें.) सांस्कृतिक नगरी पुण्यात या कलाकारांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

आपल्या व्यथा मांडताना कलाकार
हे उपोषण बालगंधर्व रंगमंदिर येथे होत असून अभिनेते कुमार पाटोळे यांच्या नेतृत्वात हे उपोषण सुरू आहे. राज्याच्या शिखर संघटनेच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनीही पाटोळेंच्या सोबत या उपोषणाला बसून पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाला महाकलामंडळातील कलाकारही उपस्थित होते.

या आहेत मागण्या

दुष्काळ, पूर, कोरोना अशा विविध परिस्थितीत सरकारकडून शेतकरी व व्यापाऱ्यांना मदत केली जाते. त्याप्रमाणे कलाकारांनाही सरकारने मदतीचा हात द्यावा. कलाकारांचा आरोग्य विमा प्रशासनाने करून दिला पाहिजे, महाराष्ट्रातील सर्व कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, संस्था यांची शासन दरबारी नोंद करावी. कलाकार म्हणून शासनाचे अधिकृत ओळखपत्र कलाकारांना द्यावे, या प्रमुख मागण्या आहेत.

हेही वाचा - खड्ड्यांमुळे पुण्याच्या स्वारगेट चौकातील भुयारी मार्ग बनलाय धोकादायक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.