ETV Bharat / state

कोरोनानंतरही बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात - Farmers in financial crisis pune

उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 25 ते 30 प्रकारच्या भाजीपाला व तरकारी मालाची खरेदी-विक्री होत असते. मात्र गेल्या वर्षभरापासून या बाजार समितीत शेतीमालाला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने, शेतकरी हतबल झाला आहे.

बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात
बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात
author img

By

Published : Jan 10, 2021, 3:26 PM IST

राजगुरूनगर (पुणे) - उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 25 ते 30 प्रकारच्या भाजीपाला व तरकारी मालाची खरेदी-विक्री होत असते. मात्र गेल्या वर्षभरापासून या बाजार समितीत शेतीमालाला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने, शेतकरी हतबल झाला आहे. कोरोनानंतर परिस्थिती बदलून भाजीपाला व तरकारी मालाला बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा असतानाही शेतमालाची विक्री कवडीमोल बाजारभावाने होत असल्याने, उत्पादन खर्च मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

उत्पादन खर्चही मिळेना

कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये शेतमालाच्या बाजार भावात चढ-उतार होऊन काही प्रमाणात पैसे शेतकऱ्यांच्या हातात येत होते. मात्र कोरोनाच्या लॉकडाउननंतर भाजीपाला व तरकारी मालाची आवक वाढू लागल्याने बाजारात विक्रीला आलेला शेतमाल कवडीमोल किमतीने विक्री होऊ लागला आहे. त्यामुळे शेतात केलेली मेहनत, बी-बियाणे, औषध फवारणी व मजुरी असा उत्पादनखर्चही मिळत नसून, सोन्यासारखा पिकवलेला शेतमालाची कवडीमोल किमतीने शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर विक्री होत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात

शेतमालाला हमी भाव दिला पाहिजे-व्यापारी

परराज्यातून व जिल्ह्या बाहेरून भाजीपाला, तरकारी मालाची आवक वाढली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात सर्वात मोठी असणार्‍या मंचर बाजारसमितीत मालाची आवक वाढली आहे. त्यामुळे शेतमालाचे बाजारभाव पडले असून, यामध्ये शेतकऱ्यांसह व्यापारी आडते यांनाही मोठा तोटा सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांची ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकारने शेतमालाला हमी भाव दिला पाहिजे असं स्पष्ट मत व्यापारी व्यक्त करत आहेत.

शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा

चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, वातावरणातील बदलामुळे पसरलेली रोगराई यामुळे शेतीसह शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटातूनही उभारी घेत शेतकरी शेतात काबाडकष्ट करून सोन्यासारखा शेतमाल तयार करत आहेत. मात्र या शेतमालाला बाजारात कवडीमोल किमतीने बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही, त्यामुळे मायबाप सरकारने या शेतकऱ्यांची परिस्थिती बदलण्यासाठी वेळीच उपाययोजना करावी, अन्यथा कोलमडलेला बळीराजा पुन्हा कधीच उभा राहणार नाही हेच या निमित्ताने समोर येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.