पुणे - घोडेगाव चास येथे बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. बाळासाहेब गणपत भोर (वय ६०) असे हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - 'मानलेलं जरी असलं, तरी रक्ताच्या नात्याहून कमी नसतं; धनंजय मुंडेंची फेसबूक पोस्ट
बाळासाहेब भोर हे सोमवारी सायंकाळच्या सुमारास शेतात कामासाठी जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक पाठीमागून हल्ला चढविला. अचानक हल्ला झाल्याने गांगरून गेलेल्या शेतकऱ्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांपासून हा बिबट्या लोकवस्ती लगत असणाऱ्या शेतामध्ये फिरत आहे. शिकारीच्या शोधात पाळीव प्राणी आणि माणसांना तो लक्ष्य करू लागला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतात काम करणारा शेतकरी हा भयभीत झाला असून बिबट्याच्या या लोकवस्तीतील वास्तव्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
हेही वाचा - 'राज्यासह पुण्यात काँग्रेसचे अस्तित्वच दिसत नाही'
दरम्यान, या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.