ETV Bharat / state

Farmer Saved Bull : अखेर पंचवीस दिवसांनंतर सर्जाची दरीतून सुटका, पहा काय आहे प्रकरण - सर्जा मालकाच्या कुशीत

एक शेतकरी मात्र त्याच्या सर्जा नावाच्या बैलासाठी सणसुद विसरून, गेली पंचवीस दिवस डोंगराच्या कडेकपारीतून त्याला बाहेर काढण्याच्या प्रयत्न करत (farmer saved bull fallen into deep ravine) होता. अखेर त्याला त्याचा सर्जा अखेर सुखरूप (farmer saved bull with disaster management team) मिळाला.

farmer saved bull
खोल दरीत पडलेल्या बैलाला शेतकऱ्याने वाचवले
author img

By

Published : Oct 25, 2022, 2:06 PM IST

पुणे : माणूस जसा आपल्या कुटुंबाशी प्रेम करत असतो, त्यापेक्षा जास्त प्रेम तो त्याने आणलेल्या आणि सांभाळलेल्या प्राण्यांशी करत असतो. त्यात जर शेतकरी म्हटले, तर बळीराजा हा आपल्या बैलांवर जिवापार प्रेम करत असतो. महाराष्ट्रसह संपूर्ण देशामध्ये दिवाळी सण उत्साहात साजरा होत असताना दुर्गम अशा वेल्हे तालुक्यातील एक शेतकरी मात्र त्याच्या सर्जा नावाच्या बैलासाठी सणसुद विसरून, गेली पंचवीस दिवस डोंगराच्या कडेकपारीतून त्याला बाहेर काढण्याच्या प्रयत्न करत (farmer saved bull fallen into deep ravine) होता. अखेर त्याला त्याचा सर्जा अखेर सुखरूप (farmer saved bull with disaster management team) मिळाला.

सर्जा खोल दरीत : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील दापोडे गावचा शेतकरी विजय शेंडकर याने सर्जा नावाचा बैल चरण्यासाठी डोंगरावर सोडला होता. दोन,तीन दिवस झाले. बैल घरी आला नसल्याने घरातील कुटुंबातील सदस्यांनी काळजीपोटी डोंगरावर शोधाशोध केल्यानंतर रांजणे गावच्या डोंगरावर बैल खोल दरीत कोसळला, असल्याची माहिती मिळाली. दुर्दैवाने सर्जा अशा ठिकाणी पडला की- तेथून त्याला पाय वाटेने बाहेर काढणे अशक्य होते. वरून व खालच्या दोन्ही बाजुने दरी असुन बैलाच्या काळजीपोटी शेतकऱ्याने दरीत दोर लावून खाली उतरत बैलाला जमेल तितका चारा, पाणी औषध, पोहोचवण्याचा प्रयत्न केला. बैलाचा जीव वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी मदतीची हाक दिली,तर सर्जाचा जगण्यासाठी संघर्ष सुरू होता.

चारा पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न : गेली पंचवीस दिवस शेतकरी व त्याचे कुटुंब रोज घरी ये -जा करत होते. डोंगराच्या कपारीत उतरून सणवार विसरून बैल जिवंत राहील व त्यास बाहेर काढता येईल, या आशेवर स्वतःचा जीव धोक्यात घालून कडे कपारीत उतरत होते. बैलाला औषध पाणी करीत होते. जमेल तितका चारा पाणी तिथे पोहोचवण्याचा प्रयत्न करीत (bull fallen into deep ravine) होते.

सर्जा बाहेर काढण्यासाठी प्रयत्न : बैलाला बाहेर काढण्याचे सर्व उपाय थकले होते. शेतकरी कुटूंब हवालदिल झाला. त्यानंतर शेतकऱ्याने पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते माऊली दारवटकर यांच्याशी संपर्क केल्यानंतर, दारवटकरांनी या विभागाचे, खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क करून या घटनेची माहिती दिली आहे. त्यानंतर सुळेंनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर जिल्हा आपत्ती कक्षाची संपर्क करत तातडीने मदत पोहचविण्याच्या सूचना दिल्यानंतर मुळशी तालुक्यातील भुगाव येथील रेस्क्यू टीमचे १० सदस्य या ठिकाणी दाखल झाले. त्यांच्यासोबत दापोडे गावचे ग्रामस्थांच्या मदतीने सर्जा बाहेर काढण्यासाठी प्रयत्न (farmer saved bull) केले.

रेस्क्यु टीमचे आभार : खासदार सुप्रिया सुळे यांच्या सुचनेनुसार घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन टिम दाखल झाली. अथक प्रयत्नानंतर सर्जाला बाहेर काढण्यात अखेर यश आले. गेल्या पंचवीस दिवसांपासून सर्जा हा दरीत पडला होता. त्यामुळे शेतकऱ्याने रेस्क्यु टीमचे यावेळी आभार मानले (disaster management team) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.