पुणे - सध्या कांद्याचे बाजारभाव गगणाला भिडल्याने शेतकरी सुखावला आहे. चाळीत साठवून ठेवलेला कांदा विक्रीसाठी बाजारात नेण्याची लगबग सुरू आहे. अशातच जुन्नर तालुक्यातील रोहकडी येथील शेतकरी नामदेव गंगाराम घोलप, कमल सदाकाळ व रावसाहेब घोलप या शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कांदा चाळीत अज्ञात समाजकंटकाने युरिया टाकल्यामुळे कांदा खराब होऊन लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे.
सध्या बाजारात कांद्याला अच्छे दिन आले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. परंतु, असा प्रकार घडू लागल्याने शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. अज्ञात समाजकंटकांकडून असे प्रकार घडू लागल्याने शेतकऱ्यांना रात्रदिवस कांदा चाळीचे रक्षण करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
हेही वाचा - पुण्याच्या महाकाली टोळीतील आरोपीला पोलिसांनी फिल्मीस्टाईलने घातल्या बेड्या
ओतूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. एच. कांबळे यांनी या घटनेची दखल घेतली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे. तसेच शासनाने या घटनेची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांकडून होत आहे.
हेही वाचा - चिंचवड विधानसभेतून तृतीयपंथी निवडणूक लढणार