ETV Bharat / state

हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष विकोपाला; प्रशासनाला विरोध करून कालव्यातून सोडले पाणी - pune water agitation

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात शेती आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सध्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यामुळे शिक्रापूर परिसरातील दहा गावांना पाणी सोडावे यासाठी शेतकऱ्यांनी 5 मेपासून उपोषण सुरू केले होते.

farmer agitation
शिरुर तालुक्यात हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष विकोपाला; प्रशासनाला विरोध करून कालव्यातून सोडले पाणी
author img

By

Published : May 10, 2020, 10:37 PM IST

पुणे - उन्हाळा आला की, शिरूर तालुक्यातील पुर्व व पश्चिम भागातील शेतकऱ्यांचा हक्काच्या पाण्यासाठी दरवर्षी संघर्ष सुरू होतो. आपल्या हक्काचे पाणी वेळेत मिळावे, यासाठी आंदोलनाचा संघर्ष करूनच पाणी मिळवावे लागते. असा संघर्ष शिक्रापूर परिसरातील दहा गावांतील शेतकरी आणि महिलांनी प्रशानाला विरोध करून चासकमानच्या कालव्यातून कोरेगाव-धानोरे शाखेची पोटचारीला पाणी सोडून आपल्या हक्काचे पाणी मिळवले आहे.

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात शेती आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सध्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यामुळे शिक्रापूर परिसरातील दहा गावांना पाणी सोडावे यासाठी शेतकऱ्यांनी 5 मेपासून उपोषण सुरू केले होते. दरम्यान, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी 10 मे रोजी पाणी सोडू, असे आश्वासन दिले होते. मात्र, आज पाणी सोडण्यास आधिकाऱ्यांची चालढकल दिसू लागल्याने नागरिकांनी पोलीस बंदोबस्त असताना आपल्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी कायदा हातात घेऊन कोरेगाव-धानोरे शाखेची पोटचारीला पाणी सोडले आहे.

दरम्यान, कोरेगाव धानोर परिसरात पोटचारीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असताना कायदा हातात घेऊ नका, असे पोलीस वारंवार सांगत होते. मात्र, आम्हाला आमच्या हक्काचे पाणी द्या आणि आम्हाला कुठं न्यायचे तिकडे न्या पण आम्ही पाणी सोडणार असा पवित्रा घेत शेतकऱ्यांनी व महिलांनी प्रशासनाचा व त्यांच्यावर दबाव आणणाऱ्या राजकीय नेत्यांचा निषेध करत अखेर शेतकऱ्यांनी आपल्या हक्काचे पाणी मिळवले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.