पुण्यातील प्रसिद्ध गोल्डमॅन सम्राट मोझे यांचे निधन - pune news
पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. ते दररोज अंगावर तब्बल साडेआठ किलो सोने घालत असल्यामुळे प्रसिद्ध झाले होते.
![पुण्यातील प्रसिद्ध गोल्डमॅन सम्राट मोझे यांचे निधन सम्राट मोझे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7080261-766-7080261-1588745345799.jpg?imwidth=3840)
सम्राट मोझे
पुणे - पुण्यातील प्रसिध्द गोल्डमॅन सम्राट मोझे यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. ते दररोज अंगावर तब्बल साडेआठ किलो सोने घालत असल्यामुळे प्रसिद्ध झाले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता.
फेसबुकच्या माध्यमातून बनावट अकाउंट तयार करून आपली बदनामी केली जात असल्यामुळे मोझे यांनी काही दिवसांपूर्वीच पुण्याच्या सायबर पोलिसात तक्रार दिली होती. मोझे हे मूळचे पिंपरी-चिंचवड शहरातील रहिवाशी होते. नंतर ते पुण्यात स्थायिक झाले.