ETV Bharat / state

अबब...फडणवीस सरकारचा जाहिरातींवरचा खर्च जाणून व्हाल थक्क!

राज्यात फडणवीस सरकारच्या कार्यकाळात वृत्तपत्र जाहिरात वगळता फक्त टीव्ही आणि रेडिओ वाहिन्यांवर जाहिरातींसाठी गेल्या पाच वर्षांत तब्बल 15 कोटी 28 लाख रूपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Feb 3, 2020, 8:33 AM IST

Updated : Feb 3, 2020, 9:16 AM IST

पुणे - राज्य सरकारने 2015-16 ते 2019-20 या कालावधीत केवळ दूरचित्रवाणी व रेडिओवरील जाहिरातींसाठी 15 कोटी 28 लाख रुपये खर्च केला आहे. यामध्ये नोव्हेंबर 2019 नंतरचा काळ वगळला, तर हा सर्व खर्च भाजप सरकारच्या काळातील आहे. दररोज सरासरी 85 हजार रुपयांचा खर्च जाहिरातींवर झाल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.

नितीन यादव ईटीव्ही भारतशी बोलताना

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील नितीन यादव यांनी ही माहिती मागवली होती. यात काही तपशील उघडकीस आले आहेत. फडणवीस सरकारने 2017-18 साली टीव्ही वाहिन्यांवरील जाहिरातींवर तब्बल 5 कोटी 99 लाख 97 हजार 520 रुपये खर्च केले असल्याची माहिती मिळाली आहे, तर याच वर्षी रेडिओ जाहिरातींवर 1 कोटी 20 लाख 69 हजार 877 रुपयांचा खर्च केला आहे.

माहिती अधिकार प्रत
माहिती अधिकार प्रत

फडणवीस सरकारच्या काळात रेडिओ वाहिन्यांवर जाहिरातीवर केलेला खर्च 2013-2014 साली 59 लाख 96 हजार 291 रुपये इतका होता. तो वाढून 2018-2019 साली 1 कोटी 85 लाख 72 हजार 887 झाल्याचे दिसत आहे, तर टीव्ही वाहिन्यांवर जाहिरातीसाठी केलेला खर्च 2013-2014 साली 53 लाख 25 हजार 730 रुपये होता, तो 2018-2019 साली वाढून तब्बल 2 कोटी 84 लाख 48 हजार 317 रुपये झाल्याची माहिती या माहिती अधिकारातून मिळाली आहे.

Intro:Body:बारामती...

फडणवीसांचा दिवसाला जाहिरात खर्च ८५ हजार रुपये

बारामती- सकारात्मक विचारसरणीचा पगडा असल्यामुळे मी आजही तरुणाईच्या मनातील मुख्यमंत्री आहे. असे अनेक कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगतात. मात्र त्यासाठी त्यांनी वृत्तपत्र जाहिरात खर्च वगळता केवळ टिव्ही व रिडीओ वाहिन्यांवर जाहिरातींसाठी गेल्या पाच वर्षात दिवसाला ८५ हजार रुपये खर्च  शासकीय तिजोरीतुन केला असल्याची माहिती आरटीआय मधून नुकतीच समोर आली आहे.
    
सकारात्मक विचारसरणीचा पगडा असल्यामुळे मी आजही तरुणाईच्या मनातील मुख्यमंत्री आहे. असे अनेक कार्यक्रमात मोठ्या आत्मविश्वासाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेला सांगतात. मात्र त्यांनी त्यासाठी प्रत्येक दिवसाला टिव्ही व रिडीओ यांच्या जाहिरातीसाठी ८५ हजार रुपये खर्च केला आहे. यामध्ये २०१५-१६ मध्ये १ कोटी ५१ लाख २७ हजार ३५३, २०१६-१७ ला ९१ लाख ५९ हजार ९५८, २०१७-१८ सालात ७ कोटी २० लाख ६७ हजार ३९७, २०१८-१९ मध्ये ४ कोटी ७० लाख २१ हजार २०४, तर २०१९-२० मध्ये ९५ लाख ७ हजार ६३ रुपये खर्च झाला आहे.  असा एकूण १५ कोटी २८ लाख ८२ हजार ९७५ खर्च झाला आहे. हा सर्व खर्च शासकीय तिजोरीतून झाला असल्याचे आरटीआय कार्यकर्ते नितीन यादव यांनी सांगितले आहे. Conclusion:
Last Updated : Feb 3, 2020, 9:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.