ETV Bharat / state

Amol Kolhe Celebrate Shiv Jayanti : शिवजयंती साजरी करण्यासाठी मी दरवर्षी पायी गडावर येतो - खासदार अमोल कोल्हे

खासदार अमोल कोल्हे यांनी शिवनेरी किल्ल्यावर होणाऱ्या शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. शिवभक्तांना किल्याच्या पायथ्याळशी अडवल्याने संभाजीरोजे यांच्यासह कोल्हे यांनी शिंदे सरकारचा निषेध केला आहे. तसेच वारंवार मागणी करुन देखील शिवनेरीवर भगवा फडकवण्याची सरकाने परवानागी दिलेली नाही. त्यामुळे खासदार अमोल कोल्हे यांनी भगवा जाणीव आंदोलन सुरु केले आहे.

Amol Kolhe
खासदार अमोल कोल्हे
author img

By

Published : Feb 19, 2023, 5:18 PM IST

खासदार अमोल कोल्हे

पुणे : शिवनेरी किल्ल्यावर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित शिवजन्म सोहळा पार पडला. त्यामुळे शिवनेरीवर आलेल्या शिव भक्तांना शिवनेरी किल्ल्याच्या शिवाई देवी मंदिराच्या इथ थांबविण्यात आले असून शासकीय कार्यक्रम सुरू असल्याचं सांगितले जात आहे. त्यामुळे शिवभक्त आक्रमक झाले असुन शिवभक्तांकडून जोरदार घोषणाबाजी करत मुख्य कार्यक्रम थांबविण्यात आला आहे.

छत्रपती संभाजी राजे आक्रमक : यावेळी प्रशासनाच्या कारभारावर माजी खासदार छत्रपती संभाजी राजे हे देखील आक्रमक झाले होते. मुख्य कार्यक्रम काही वेळ थांबविण्यात आले होते. यावर खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की मी दरवर्षी हेलिकॉप्टर नव्हे तर पायी गडावर येऊन शिवजयंती साजरा करत असतो.असा टोला यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला आहे.

शासकीय कार्यक्रमाचा निषेध : शिवनेरीवर किल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवण्याची मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. तसेच शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार त्यांनी बहिष्कार टाकला आहे. असंख्य कार्यकर्त्यांसह भगवा ध्वज जाणीव आंदोलन सुरू करत पायी शिवनेरीवर भगवा झेंडा घेऊन आले होते. यावेली त्यांनी प्रकारांशी संवाद साधत शासकीय कार्यक्रमाचा निषेध नोंदवला.

भगवा ध्वज जाणीव आंदोलन : छत्रपती शिवराय यांच्या शिवनेरीवर किल्लावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवा याकरता 2021 पासून सरकार दरबारी, पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे करत आहे. तरीदेखील संपूर्ण शिवभक्तांची मागणी दुर्लक्षित असल्यामुळे आता त्याकरिता भगवा ध्वज जाणीव आंदोलन खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी छेडले आहे.

शिवनेरीवर भगवा फडकवण्याची मागणी : शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा फडकवावा, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. वारंवार मागणी करूनही सरकार या मागणीकडे लक्ष देत नसल्याने अमोल कोल्हे आक्रमक होताना दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज भारताचे आदर्श आहेत. शिवनेरीवर भगवा फडकवण्याची शिवभक्तांची मागणी.

मागणी फेटाळली : त्यामुळे याबाबत मी केंद्रीय मंत्र्यांना वारंवार विचारणा केली आहे. संसदेच्या अधिवेशनातही ही मागणी फेटाळण्यात आली. मात्र, सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. मात्र ही मागणी मान्य न झाल्याने भगवा जागृती आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा - Sanjay Raut Claim : निकाल विकत घेण्यासाठी आतापर्यंत 2 हजार कोटी खर्च; खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.