ETV Bharat / state

पुणे : जलतरण तलावात पडून अभियंत्याचा मृत्यू - pune

थेरगाव येथील पालिकेच्या खिंवसरा जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या अभियंत्याचा मृत्यू झाला आहे.

वैभव जैन
author img

By

Published : Aug 20, 2019, 8:09 AM IST

Updated : Aug 20, 2019, 9:21 AM IST

पुणे - जलतरण तलावात एका संगणक अभियंत्याचा मृत्यू झाला आहे. वैभव आचाल जैन (वय २३ वर्षे) असे संगणक अभियंत्याचे नाव आहे. तो हिंजवडीमध्ये एका खासगी सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होता.

जलतरण तलावात पडून अभियंत्याचा मृत्यू

वैभव हा काल (सोमवार) तो सायंकाळी थेरगाव येथील महापालिकेच्या खिंवसरा जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला होता. पोहण्याची तयारी करून तो बसला होता. त्याला अचानक चक्कर आल्याने तो ५ फूट खोल पाण्यात पडला. त्यावेळी त्या ठिकाणी कोणीही नव्हते. दहा मिनिटांनंतर तेथे जीवरक्षक पोहोचले. त्यानंतर वैभवला तात्काळ बेशुद्धावस्थेत तातडीने औंध येथील शासकीय रूग्णालयात रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैभवला मृत घोषित केले, अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

Intro:mh_pun_02_death_av_mhc10002Body:mh_pun_02_death_av_mhc10002

Anchor:-जलतरण तलावात एका संगणक अभियंत्याचा मृत्यू झाला आहे. वैभव आचाल जैन असे २३ वर्षीय संगणक अभियंत्याचे नाव आहे. तो हिंजवडीमध्ये एका खासगी सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होता. दरम्यान, तो तलावाच्या कडेला थांबला होता अचानक त्याला चक्कर आणि पाच फूट खोल पाण्यात पडला, दहा मिनिटं मृत्यूशी झुंज देत होता. परंतु, संबंधित जीवरक्षकांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. दहा मिनिटं झाल्यानंतर तो पाण्यात पडल्याचे निदर्शनास आले आणि तातडीने रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत वैभव चा दुर्दैवी मृत्यू झाला होता. वैभव हा शनिवारी सायंकाळी थेरगाव येथील महापालिकेच्या खिंवसरा जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला होता. दरम्यान, तो पोहण्याची तयारी करून जलतरण तलावाच्या कडेला थांबला होता. अचानक वैभव ला चक्कर आली आणि पाच फूट खोल जलतरण तलावातील पाण्यात पडला त्यापूर्वी त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. दुर्दैव म्हणजे त्याला पडताना कोणीही पाहिले नाही, पडल्यानंतर दहा मिनिटांनी उपस्थित जीवरक्षकांनी पाण्यातून बाहेर काढले. तो पाण्यात निपचीप पडलेला होता, त्याची शुद्ध हरपलेली होती. तातडीने औंध येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु वैभव चा उपचारापूर्वी मृत्यू झाला अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत. Conclusion:
Last Updated : Aug 20, 2019, 9:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.