पुणे - राज्यातील पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण 9 मार्च, 2020 रोजी पुणे शहरात आढळून आला. त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्यात कोरोना रुग्ण संख्येत पुणे हे केंद्रस्थानी राहिले. तिसऱ्या लाटेतही शहरासह जिल्ह्यात दिवसंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मात्र, समाधानकारक बाब म्हणजे जिल्ह्यातील अकराशे गावं कोरोनामुक्त ( Corona Free Village in Pune District ) झाली आहेत. दोनशे ग्रामपंचयातीमध्ये आज एक किंवा दोन सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत जिल्ह्यातील 48 गावांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही तर 500 पेक्षा जास्त ग्रामपंचायतीत पाचपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद ( CEO Ayush Prasad )यांनी दिली.
जिल्ह्यातील 650 ग्रामपंचायती पूर्ण लसवंत - पुणे जिल्ह्यात 80 लाखांहून अधिक हे मतदार आहेत. या मतदार यादीपेक्षा 7 लाखांहून अधिक लसीकरण जिल्ह्यात झाले ( Corona Vaccination in Pune District ) आहे. इतर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात आलेल्या नागरिकांचेही लसीकरण करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी शंभरहून अधिक आहे. 650 ग्रामपंचायतीतील नागरिकांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याने या ग्रामपंचायती पूर्ण लसवंत झाल्या आहेत. जिल्ह्यातील 17 लाख नागरिकांनी लसीची केवळ एकच मात्रा घेतली आहे. ग्रामीण भागाता हा आकडा पाच लाख असून त्यापैकी दीड लाख नागरिकांचे मोबाईल क्रमांक मिसिंग दाखवत आहेत. 50 हजार नागरिकांनी दोन वेळा लसीची पाहिलीच मात्रा घेतल्याचे दाखवत आहे. ज्या नागरिकांनी लसीची दुसरी मात्रा घेतली नाही अशा नागरिकांसाठी जनजागृती करण्यात येत आहे. लवकरात लवकर नागरिकांनी लसीची दुसरी मात्रा घ्यावी, असे आवाहनही यावेळी आयुष प्रसाद यांनी केले.
जिल्ह्यातील सुमारे 17 ते 18 हजार नागरिकांचा लसीला नकार - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविली जात आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील सुमारे 17 ते 18 हजार नागरिकांनी लसीकरणास नकार ( Corona Vaccination in Pune District ) दिला. अशा लोकांसाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले.
हेही वाचा - Grant To Gram Panchayat : कोविड व्यवस्थापनात चांगले काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना 50 लाख रुपयांचे अनुदान