ETV Bharat / state

Project In Pune : आता पुण्यात होणार ईलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिग क्लस्टर! - Big Projects Going Out Of Maharashtra

मोठे प्रकल्प राज्याबाहेर जात ( Big Projects Going Out Of Maharashtra ) असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने आता प्रतिमा सुधारण्यासाठी राज्यात नवे प्रकल्प येत असल्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने दोन हजार कोटींचा प्रकल्प देण्याची घोषणा केल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि त्यापाठोपाठ उद्योगमंत्र्यांनी केली आहे. मात्र, हा आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया विरोधकांनी व्यक्त केली आहे.

Uday Samant
उद्योगमंत्री उदय सामंत
author img

By

Published : Oct 31, 2022, 7:21 PM IST

मुंबई : राज्यातील लाखो कोटी रूपयांचे प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ( Big Projects Going Out Of Maharashtra ) आता राज्यात नविन प्रकल्प येत असल्याची ग्वाही दिली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत घोषणा करताना राज्यात ईलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिग क्लस्टर येणार ( electronic manufacturing cluster Project Pune) असल्याची घोषणा केली. याचे स्वागत करीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत अधिक माहिती दिली ( Industries Minister Uday Samant ) आहे.

पुण्यात होणार ईलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिग क्लस्टर : राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणातंर्गत रांजणगाव पुणे येथे २९७.११ एकरमध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरसाठी केंद्र सरकारने आज मान्यता दिली आहे. या माध्यमातून ५००० तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. तसेच पुण्यामध्ये सीडीएसी हाही प्रकल्प ( CDAC project Pune ) लवकरच येणार असून या दोन्ही प्रकल्पांच्या माध्यमातून सुमारे २००० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. युती सरकारने हे प्रकल्प राज्यात येण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केलेला आहे. यास्तव समितीची १९ जुलै २०२२ रोजी बैठक घेण्यात आली होती. अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

ईलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिग क्लस्टर काय असेल ? : या क्लस्टरसाठी ४९२.८५ कोटी खर्च होणार असून हा प्रकल्प ३२ महिन्यात पूर्ण होणार आहे. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून उद्योजकांना प्रोत्साहन ( Encouraging entrepreneurs ) मिळणार असून इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, सोलार पीव्ही मॅन्युफॅक्चरिंग, ई मोबिलिटी उत्पादक असे अनेक उद्योग येणार आहेत. या माध्यमातून रोजगार निर्माण होणार आहेत, असेही ते म्हणाले.

आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रयत्न : दरम्यान, यासंदर्भात बोलताना कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितले की, हा तर चक्क आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार आहे. कारण राज्यातील लाखो कोटी रुपयांचे महत्त्वाचे प्रकल्प गुजरातच्या घशात घालून काही हजार कोटी रूपयांचे प्रकल्प महाराष्ट्राला देवून ही केंद्र आणि भाजपाने महाराष्ट्राची बोळवण केली आहे. महाराष्ट्रातील जनतेचा हा अपमान आहे, असेही लोंढे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.