ETV Bharat / state

हजारो वीज कंत्राटी कामगारांची दिवाळी वेतनाविना अंधारात - वीज कंत्राटी

महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीतील हजारो वीज कंत्राटी कामगारांचे दिवाळीपूर्वी वेतन व बोनस न झाल्याने त्यांची दिवाळी वेतनाविनाअंधारात गेली आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाने आज (दि.4) पुण्यातील रास्ता पेठ येथील वीज कंपनी येथे प्रशासन आणि ऊर्जा मंत्रालयाचा जाहीर निषेध नोंदवला आहे.

electric-workers-on-strike-in-pune
महावितरण महापारेषण महानिर्मिती
author img

By

Published : Nov 4, 2021, 8:45 PM IST

पुणे - महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीतील हजारो वीज कंत्राटी कामगारांचे दिवाळीपूर्वी वेतन व बोनस न झाल्याने त्यांची दिवाळी वेतनाविनाअंधारात गेली आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाने आज (दि.4) पुण्यातील रास्ता पेठ येथील वीज कंपनी येथे प्रशासन आणि ऊर्जा मंत्रालयाचा जाहीर निषेध नोंदवला आहे.

हजारो वीज कंत्राटी कामगारांची दिवाळी वेतनाविना अंधारात

कामगारांची दिवाळी काळी

कोरोना काळात या कामगारांनी आपला जीव धोक्यात घालून राज्यातील जनतेला अखंडित व सुरळीत वीज सेवा देण्यात मोठे योगदान दिले असताना 55 कामगार शहीद झाले तसेच वीज बिल वसुलीसाठी प्रसंगी वीज ग्राहक नागरिकांच्या शिव्या, मार खाऊन वीज बिल वसुलीही जोमाने केली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर या कष्टकरी कंत्राटी कामगारांचे वेतन व बोनस दिवाळीपूर्वी होणे गरजेचे आहे. याबाबत पत्र संघटनेने 13 सप्टेंबर, 2021 रोजी राज्याचे प्रधान ऊर्जा सचिव व तिन्ही वीज कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले होते. मात्र, दीड महिना अगोदर पत्र देऊन देखील प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत या कामगारांची दिवाळी काळी करण्याचा घाट घातला आहे की काय, अशी शंका व्यक्त होत आहे.

वेतानासाठी अक्षरशः भिक मागण्याची वेळ

रिक्त पदांवर तुटपुंज्या वेतनावर वर्षानुवर्षे कष्ट करणाऱ्या व विक्रमी वीज बिलाचा महसूल गोळा करून कंपनीच्या संचालक मंडळ ते शिपाई पदाच्या कामगारांची दिवाळी गोड करणाऱ्या वीज कंत्राटी कामगारांना मात्र आज स्वतःच्या वेतनासाठी कंत्राटदारांना विनवण्या करण्याची व आपल्याच हक्काच्या कष्टाच्या घामाच्या मेहनतीच्या वेतानासाठी अक्षरशः भीक मागण्याची वेळ शासन, उर्जामंत्रालय आणि वीज कंपनी व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामूळे आल्याचे चित्र राज्यभर दिसत आहे.

हे ही वाचा - नव्या वर्षात मेट्रो पुणेकारांच्या सेवेत; वानज ते गरवारे कॉलेज, पिंपरी ते फुगेवाडी या मार्गाचे काम पूर्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.