पुणे - खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची पॅरोलवर सुटका झाल्यानंतर बेकायदा जमाव जमवून सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता रस्त्याने हुल्लडबाजी करणाऱ्या आठ जणांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. अटक आरोपीमध्ये पिंपरी चिंचवड पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस कर्मचारी शरीफ बबन मुलानी (वय 36) याच्यासह आठ जणांना पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खुनप्रकरणात येरवडा कारागृहात असलेले आरोपी समीर मुलानी व जमीर मुलानी यांची शुक्रवारी सायंकाळी पॅरोलवर सुटका करण्यात आली. त्यांची सुटका होणार असल्याचे माहीत झाल्याने आरोपीचे भाऊ, नातेवाईक आणि मित्रमंडळी येरवडा कारागृहाबाहेर जमले होते. आरोपी तुरुंगातून बाहेर येताच त्यांच्या समर्थकांनी दुचाकी व चारचाकी गाड्यांमधून तोंडाला मास्क न लावता व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता विश्रांतवाडीच्या दिशेने निघाले होते.
दरम्यान, विश्रांतवाडी पोलिसांनी फुले नगर येथील आरटीओ चौकात या सर्वांना थांबण्यास सांगितले. मात्र, काही गाड्या न थांबता निघून गेल्या. पोलिसांनी थांबवलेल्या एका गाडीतून एक गावठी पिस्तूल, 5 जिवंत काडतुसे, लोखंडी बार आणि फॉर्चूनर, स्कॉर्पिओ आणि एक स्विफ्ट कार जप्त केल्या आहेत. अटक केलेल्या आरोपींविरोधात बेकायदा गर्दी जमवून दंगल माजविण्याचा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कोविड 19 आणि जमावबंदी कायद्याच्या भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पॅरोलवर सुटल्यानंतर हुल्लडबाजी करणाऱ्या आठ जणांना अटक - criminal yerwada jail
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खुनप्रकरणात येरवडा कारागृहात असलेले आरोपी समीर मुलानी व जमीर मुलानी यांची शुक्रवारी सायंकाळी पॅरोलवर सुटका करण्यात आली. त्यांची सुटका होणार असल्याचे माहीत झाल्याने आरोपीचे भाऊ, नातेवाईक आणि मित्रमंडळी येरवडा कारागृहाबाहेर जमले होते.