चाकण (पुणे) - चाकण जवळील रासे गावात गट क्रमांक 718, 719, 720 येथे शासकीय मोजणीनंतर हद्दीच्या खुणा कायम करण्यासाठी गेलेल्या मोजणी महिला आधिकारी व कर्मचाऱ्यांना 8 जणांनी दगड, लाठ्या-काठ्या, लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आठ जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे.
चाकण जवळील रासे येथे शासकीय मोजणीच्या हद्द कायम करण्यासाठी गेलेल्या मोजणी आधिकारी पुजा सानप, अन्नपुर्णा चापाइत, चंद्रकांत काळे, सचिन नाईकडे यांना आठ जणांनी मारहाण केली आहे. या प्रकरणी या आठ जणांविरोधात पूजा सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आठ जणांना अटक
या घटनेप्रकरणी संपत लोणारी, अतिष लोणारी, प्रकाश लोणारी, विलास लोणारी, विनित लोणारी, अमित लोणारी, आकाश लोणारी, विकास यांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस निरिक्षक प्रकाश धस यांनी दिली.
हेही वाचा - पिंपरीत गंभीर गुन्ह्यांचे कलम कमी करून आरोपीला मदत; दोन पोलीस अधिकारी निलंबित
हेही वाचा - नुकताच जन्मलेलं बिबट्याचे पिल्लू आढळला रस्त्यावर; स्थानिक नागरिकांनी दिले वनविभागाकडे