ETV Bharat / state

शालेय पोषण आहारात अंड्यांना सर्वच स्तरातून विरोध, पौष्टिक आहारासाठी इतरही पर्याय उपलब्ध

Eggs are opposedशालेय पोषण आहारात अंडी देण्यास सर्वच स्तरातून विरोध होत आहे. त्याऐवजी इतर पौष्टिक पदार्थ देण्याचा सूर आळवण्यात येत आहे. अंडी मांसाहारी असल्याचा दावा करुन त्यातून जास्त पोषणमूल्ये मिळत नसल्याचाही दावा करण्यात येत आहे. वाचा कोण काय म्हणतंय याचा हा रिपोर्ट.

अंड्यांना सर्वच स्तरातून विरोध
अंड्यांना सर्वच स्तरातून विरोध
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 11, 2023, 11:02 PM IST

पुणे Eggs are opposed : महाराष्ट्र सरकारने शाळेतील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात उकडलेली अंडी, अंडा भुर्जी, अंडा बिर्याणी, केळी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानंतर विविध मतप्रवाह आता बोलले जात आहेत. एवढंच नव्हे तर राज्यातील शालेय पोषण आहारात अंडी देण्याच्या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे. या निर्णयाला भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीने विरोध केला आहे. त्याऐवजी दूध द्या अशी मागणी केली आहे. तर पालक संघटनांनी देखील याला विरोध केला आहे.

राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. पोषण आहार योजनेत शासनाकडून विद्यार्थ्यांना नियमित आहारासह आठवड्यातून एक दिवस अंडी तसेच जे विद्यार्थी अंडी खात नाहीत त्यांना केळी देण्यात येणार आहेत. मात्र शासनाच्या या निर्णयाला आता सर्वच स्तरातून विरोध होऊ लागला आहे.

या निर्णयावर पालक संघटनेचे अध्यक्ष जयश्री देशपांडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की शासनाने जो काही निर्णय घेतला आहे, त्याबाबत पालकांमध्ये नाराजी आहे. सर्वच मुले हे अंडी खातात असे नाही. सरकारला यात कवटी घोटाळा करायचं आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो. अंड्याच्या व्यतिरिक्त खूप काही पौष्टिक पदार्थ आहेत जे मुलांना देता येऊ शकतात. खजूर तसेच ड्रायफ्रुट देखील देता येऊ शकतात. तसेच शिलाजीत सारखे देखील पदार्थ देऊ शकतात. याचं आम्ही स्वागत देखील करू. पालक संघटना म्हणून आमची मागणी आहे की, सरकारने अंडी ऐवजी व्हेज पदार्थांचा समावेश करावा असं देशपांडे यांनी सांगितलं.

शासनाच्या या निर्णयावर सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गंगवाल यांनी देखील आक्षेप घेतला. त्यांनी देखील शासनाने हा निर्णय बदलावा अशी मागणी केली आहे. शाळांमधून जेवणात अंडी देणे अयोग्य आहे. अंडे हे मांसाहारी असून अंड्यातून कुठलेही पोषक घटक मिळत नाहीत. अंड्यात 'सी' व्हिटॅमिन नाही. प्रोटिन्सही केवळ १३.५ टक्के इतकेच आहेत. त्यामध्ये कोलेस्ट्रॉल मोठ्या प्रमाणात असते. अंड्यांची उत्पत्ती अधिक व्हावी, याकरिता अनैसर्गिक पोल्ट्रीम केली जाते. अंडी शिळी की ताजी हेही आपल्याला माहिती नसते. त्यामुळे त्यातून अनेक रोगांना निमंत्रण मिळते, असं डॉ. गंगवाल यांनी सांगितलं.

शालेय पोषण आहारात शासनाने जो अंडी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक आघाडीने देखील विरोध केलं आहे. शालेय विद्यार्थ्यांना अंडी ऐवजी देशी गाईचं दूध, सुकामेवा देण्यात याव तसेच येत्या 20 तारखेच्या आत हा निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन करू आणि शाळांपर्यंत अंडी पोहोचू देणार नाही असा इशारा भाजप अध्यात्मिक आघाडीने दिला आहे.

यावर डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले की लहान मुलांना अंडी देणे खूपच चागलं आहे. याने त्यांना प्रोटीन तसेच मुलांचं कुपोषण दूर होण्यास मदत होईल.अंडी दिल्याने मुलांना कोणतेही नुकसान होणार नाही. तसेच त्यांच्या पचनात काहीही फरक पडत नाही. एका शास्त्रीय विचारा नुसार अंडी देखील शाकाहारी समजली जातात. परंतु आपल्याकडे अंडी मासांहारी समजली जातात आणि त्याला विरोध केला जात असल्याचं यावेळी भोंडवे यांनी सांगितलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.