ETV Bharat / state

'कोरोना' प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे अजित पवारांचे निर्देश - अजित पवार

बारामती शहरासह तालुक्यात 'कोरोना'चा प्रसार रोखण्यासाठी 'कोरोना' प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती येथे अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (शनिवार) आढावा बैठक झाली.

Effectively implement corona 'preventive measures says  Deputy C M Ajit Pawar in baramati
'कोरोना' प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे अजित पवारांचे निर्देश
author img

By

Published : Aug 1, 2020, 8:21 PM IST

बारामती (पुणे) - बारामती शहरासह तालुक्यात 'कोरोना'चा प्रसार रोखण्यासाठी 'कोरोना' प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती येथे अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (शनिवार) आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

कोरोनाच्या सर्वच रुग्णांना बेड मिळणे आवश्यक आहे. बारामती येथील कोव्हिड सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने कोरोना संसर्गाच्या उपचारासाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करावे, त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. हॉस्पिटलमध्ये सर्वच कोरोना रुग्णांना बेड मिळणे आवश्यक आहे. सर्वसामान्य लोकांना या सुविधेचा लाभ मिळणे आवश्यक आहे. तसेच 'कोरोना' रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात यावेत तसेच इतर गंभीर आजारी कोणताही रुग्ण उपचाराशिवाय राहता कामा नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. भविष्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रशासनाने अधिक दक्ष राहून काम करावे, तसेच गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल, याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. तांबे यांनी कोरोना रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधाविषयीची माहिती दिली. तसेच उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती तालुक्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, मुख्य अभियंता महावितरण, सुनील पावडे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, सिल्‌व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.