ETV Bharat / state

Hasan Musrif ED Raid : कोल्हापूर पाठोपाठ हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील घरासह कार्यालयावर ईडीची छापेमारी - Hasan Mushrif

सन मुश्रीफ यांच्या घरावर आज पहाटे 6 वाजताच अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापे टाकले ( Kirit Somaiya allegation on Hasan Mushrif ) आहेत. किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफांवर 100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले ( 100 crore scam allegation on Hasan Mushrif ) होते. त्यामुळे त्यांच्या पुण्यातील कोंढवा, हडपसर तसेच कोरेगांव पार्क येथील त्यांच्या घर आणि कार्यालय येथे ईडीची छापेमारी सुरू आहे.

Hasan Musrif ED Raid
Etv Bharathttp://10.10.50.85:6060///finalout4/maharashtra-nle/finalout/11-January-2023/17454259_dghngfn.mp4
author img

By

Published : Jan 11, 2023, 1:08 PM IST

पुण्यातील घरासह कार्यालयावर ईडीची छापेमारी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज पहाटे 6 वाजताच अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापे ( Hasan Musrif ED Raid ) टाकले आहेत. हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीसह आयकर विभागाकडून छापेमारी सुरू असून पुण्यातील कोंढवा, हडपसर तसेच कोरेगांव पार्क येथील त्यांच्या घर आणि कार्यालय येथे ईडीची छापेमारी सुरू ( ED raid Hasan Mushrif house and office ) आहे. हसन मुश्रीफ यांचा मुलगा साजिद मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील घरावरही आयकर विभागाकडून छापेमारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

किरीट सोमैय्या यांचे हसन मुश्रीफांवर आरोप : भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले ( Kirit Somaiya allegation on Hasan Mushrif ) होते. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या जावयासह 100 कोटींचा घोटाळा ( 100 crore scam allegation on Hasan Mushrif ) केला. असा आरोप सोमय्यांनी मुश्रीफ यांच्यावर केला. या प्रकरणीच ही छापेमारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

यापूर्वीही हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी : साखर कारखान्यातील गैरव्यवहारप्रकरणी यापूर्वीही हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली होती. जुलै 2019 मध्ये हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आणि साखर कारखान्यावर छापेमारी झाली होती. मुश्रीफ यांचे व्यवसायिक भागीदार चंद्रकांत गायकवाड यांच्या ब्रिक्स इंडीया प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीच्या शिवाजीनगर येथील कार्यालयात ईडीकडून पाहणी करण्यात आली. त्याशिवाय कोरेगांव पार्क येथील त्यांच्या घरावर देखील छापेमारी करण्यात येत आहे.

विशिष्ट जातीच्या राजकारण्यांना टार्गेट करण्याचे काम सुरू : दोन वर्षांपूर्वीसुद्धा आमच्या घरासह नातेवाईक आणि कारखान्यावर एकाच वेळी छापा पडला होता. त्यावेळी तपास यंत्रणांना सहकार्य करत सर्व माहिती सादर केली होती. मात्र आज पुन्हा एकदा घरासह, कारखाना आणि नातेवाईकांच्या घरांवर सुद्धा छापा पडला आहे. त्यामुळे तो आता कशासाठी माहिती नसल्याचे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. शिवाय आपल्या कार्यकर्त्यांनी शांत राहून कागल बंदचा निर्णय मागे घ्यावा असे त्यांनी आवाहन केले आहे. तपास यंत्रणांना सहकार्य करण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे. विशिष्ट जातीच्या राजकारण्यांना टार्गेट करण्याचे काम सुरू आहे. आधी नवाब मलिक आता मी आणि अस्लम शेख यांच्यावर सुद्धा कारवाई होईल असे बोलले जाते आहे. हे निषेधार्ह आहे असेही ते म्हणाले आहे. यापूर्वीच्या कारवाईत काहीही सापडले नसून आता सुद्धा काहीही सापडणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.