ETV Bharat / state

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल - ed summens to eknath khadse

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीकडून चौकशीचे समन्स पाठवण्यात आले होते. त्यांना भोसरी एमआयडीसी परिसरामध्ये जमीन व्यवहारा संदर्भात हे समन्स बजावले आहे. एकनाथ खडसे हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहे.

खडसे यांची ईडी चौकशी
खडसे यांची ईडी चौकशी
author img

By

Published : Jan 15, 2021, 8:40 AM IST

Updated : Jan 15, 2021, 1:30 PM IST

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महसूल पद गमावलेले एकनाथ खडसे यांना ईडीकडून चौकशीचे समन्स पाठवण्यात आले आहे. त्यांना भोसरी एमआयडीसी परिसरामध्ये जमीन व्यवहारा संदर्भात हे समन्स बजावले आहे. एकनाथ खडसे यांची शुक्रवारी ईडी चौकशी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात चौकशीसाठी शुक्रवारी हजर होणार आहेत. पुण्यातील भोसरी येथील ‘एमआयडीसी’च्या जमीन खरेदी प्रकरणासह अन्य प्रकरणांमध्ये त्यांची चौकशी होणार आहे. ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहेत. तसेच ते ईडीच्या चौकशीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही वेळापूर्वीच त्यांची मुलगी शारदा चौधरी देखील ईडीच्या कार्यालयात दाखल झाली आहे.

खडसे यांची ईडी चौकशी

काय आहे प्रकरण
तत्कालीन भाजप सरकारमध्ये महसूल मंत्री पदावर असलेल्या एकनाथ खडसे यांच्यावर पत्नी व जावयाकडून पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसी परिसरातील जमीन व्यवहार करण्यात आला होता. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केले होते. मात्र, हा व्यवहार पूर्णपणे खाजगी जमिनीचा झालेला असून कायद्याच्या चौकटीत राहूनच पत्नी व जावयाकडून ही जमीन विकत घेतली गेल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केलेला होता. या अगोदर या संदर्भात 3 तपास यंत्रणांकडून एकनाथ खडसे यांना क्लीनचिट देण्यात आली होती. आपण कुठलीही चुकीची गोष्ट केली नसल्याचे एकनाथ खडसे हे वारंवार सांगत आले आहेत.

खडसे यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश आणि ईडी नोटीसराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असताना एकनाथ खडसे यांनी अगोदरच ईडी लावण्याबाबत शक्यता व्यक्त केली होती. तुम्ही माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावेल, असा इशारा त्यांनी त्यांच्या विरोधकांना दिलेला होता. या प्रकरणांमध्ये अंजली दमानिया यांनी सुरुवातीपासूनच एकनाथ खडसे यांच्या विरोधात गैरव्यवहारप्रकरणी आरोप केलेले आहेत.

हेही वाचा - अवघ्या १५ वर्षाचा 'कारबॉय' : अंश राव

Last Updated : Jan 15, 2021, 1:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.