ETV Bharat / state

'दारूच कायले सुरू केली?'.. मद्यपीच्या पत्नीचा सरकारला सवाल

author img

By

Published : May 5, 2020, 8:17 PM IST

दारू पिऊन नवऱ्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण केल्याने महिलेने नवऱ्याला थेट पोलीस ठाण्यात आणले आणि दारूची दुकाने कशाला सुरू केली, अशी भावना व्यक्त केली.

lockdown liquor shop open pune
मद्यपी

पुणे - लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकजण घरातच बसून सुखी संसारात रमल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, दीड महिन्यानंतर राज्यसरकारने दारूची दुकाने सुरू केली आणि सुखी संसाराला पुन्हा ग्रहण लागले. याचा प्रत्यय शहरातील राजगुरूनगर येथे आला आहे. दारू पिऊन नवऱ्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण केल्याने महिलेने नवऱ्याला थेट पोलीस ठाण्यात आणले आणि दारूची दुकाने कशाला सुरू केली, अशी भावना व्यक्त केली.

प्रतिक्रिया देताना पीडित पत्नी

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे, प्रशासनाने नागरिकांना नियमांचे पालन करत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. मात्र, अनेक मद्यपी दारू दुकाने सुरू झाल्याने मोकाट झाली असून दारूच्या नशेत घरातील महिलांना मारहाण करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राजगुरूनगर परिसरात वास्तव्यास असलेले पर जिल्ह्यातील हे कुटुंब मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. लॉकडाऊनमुळे दारूची दुकाने बंद करण्यात आली होती. त्यामुळे तळीराम शांत होते व त्यांचा संसार सुखी होता. दारू पिऊन मारहाणीच्या घटनेतही कमी आली. मात्र, आता लॉकडाऊन-३ मध्ये राज्य सरकारने संपूर्ण राज्यात दारूची दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात दीड महिना सुखी संसार अनुभवत असलेल्यांच्या संसाराला ग्रहण लागले आहे. मद्यपींकडून महिलांवर हिंसाचार होत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत.

हेही वाचा- पुण्यातून रेल्वेने परराज्यात जाणाऱ्या मजुरांचा खर्च काँग्रेस करणार- माजी आमदार मोहन जोशी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.