ETV Bharat / state

पुणे शहर अमली पदार्थांच्या विळख्यात; आठ महिन्यात 52 लाखांचे अमली पदार्थ जप्त

अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या आठ महिन्यात केलेल्या कारवाईत सर्वाधिक 55 किलो गांजा जप्त केला आहे. त्याची किंमत 9 लाख 64 हजार 340 रुपये इतकी आहे. त्याखालोखाल 424 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. त्याची किंमत 38 लाख 81 हजार 800 रुपये इतकी आहे. याशिवाय चरस, मेफेड्रोन यासारखे अमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत.

पुणे
पुणे
author img

By

Published : Sep 9, 2020, 9:18 PM IST

पुणे - अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांचा पुणे शहरात मुक्त वावर सुरू आहे की काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. पुणे शहरात कोकेन, गांजा, चरस, मॅफेड्रोन, ब्राऊन शुगर, अफूची बोंडे, एलएसडी यासारखे अमली पदार्थ सर्रास उपलब्ध होत आहेत. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ व खंडणीविरोधी पथकाने मागील आठ महिन्यात 52 लाख 53 हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. याप्रकरणी 37 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वीच अमली पदार्थविरोधी पथकाने पुण्यातील कोंढवा परिसरातून 3 लाख 30 हजार रुपये किमतीचे 55 ग्रॅम कोकेन जप्त केले होते.

अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या आठ महिन्यात केलेल्या कारवाईत सर्वाधिक 55 किलो गांजा जप्त केला आहे. त्याची किंमत 9 लाख 64 हजार 340 रुपये इतकी आहे. त्याखालोखाल 424 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. त्याची किंमत 38 लाख 81 हजार 800 रुपये इतकी आहे. याशिवाय चरस, मेफेड्रोन यासारखे अमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत.

हेही वाचा - कंगना वादावर संजय राऊतांचे आता 'नो कॉमेंट'

अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची विक्री करण्याची पद्धत ठरलेली असते. त्यांच्याकडे येणारा ग्राहक हा कोणाच्या तरी शिफारशीवरून आलेला असतो. त्या शिवाय ते अमली पदार्थांची विक्री करत नाहीत. संबंधित ग्राहकाला ठराविक ठिकाणी बोलावून त्याच्या हातात अमली पदार्थाची पुढी देऊन काही सेकंदात हे विक्रेते पसार होतात. पूर्वी अमली पदार्थ विक्री करणार्‍यांचे एक ठराविक ठिकाण असायचे. मात्र, आता पोलिसांकडून सातत्याने होत असलेल्या कारवाईच्या भीतीने ते सतत आपली ठिकाणे बदलत असतात.

ब्राऊन शुगर आणि कोकेन विक्री प्रकरणात विदेशी आरोपींची संख्या जास्त आहे. विदेशी आरोपी अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात सापडल्यास त्यांना न्यायालयात दोषारोपपत्र सादर होईपर्यंत येथेच राहावे लागते. त्यामुळे काही काळ गेल्यानंतर हे आरोपी पुन्हा अमली पदार्थ तस्करीकडे वळत असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा - आम्ही जीवाचं रान करून आरक्षण टिकवलं, पण यांनी ते घालवलं...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.