पुणे - आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९वी जयंती आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहाने त्यांची जयंती साजरी करण्यात येते. पुणे स्टेशन परिसरातील आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येत होते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने बाबासाहेबांची जयंती शांततेत साजरी करण्यात आली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत नागरिकांनी घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे यंदा बाबासाहेंबाची जयंतीदेखील नागरिकांनी घरात बसूनच साजरी केली आहे.