ETV Bharat / state

Dr. Avinash Bhondve on Mask Free Maharashtra : महाराष्ट्र मास्क मुक्ती करण्याचा निर्णय अनाकलनीय - डॉ. अविनाश भोंडवे

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क हा एकमेव उपाय असल्याचं तज्ञांकडून वारंवार सांगितलं जात होतं. मास्क वापरामुळे आपण कोरोना संसर्गाला ९५ टक्के टाळू शकतो, हे देखील सिद्ध झाले आहे. मात्र, आता कोरोनाची तिसरी लाट ओसरत असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य मास्क मुक्त ( Mask Free Maharashtra ) करण्याचा विचार सरकार करत असल्याचं समोर आले आहे.

Dr. Avinash Bhondve
अविनाश भोंडवे
author img

By

Published : Jan 28, 2022, 5:21 PM IST

Updated : Jan 29, 2022, 11:52 AM IST

पुणे - मास्कमुक्त महाराष्ट्र हा अनाकलनीय विचार आहे, असे मत आएमएचे माजी अध्यक्ष अविनाश भोंडवे ( Dr. Avinash Bhondve with ETV Bharat ) यांनी व्यक्त केले आहे. राज्य मंत्रिमडळाच्या काल झालेल्या बैठकीत मास्क मुक्त महाराष्ट्र ( Mask Free Maharashtra ) या विषयावर चर्चा झाली. मास्कची सक्ती आहे ती हटवून खरेच राज्य मास्क मुक्त होऊ शकतो का, या विषयावर काल चर्चा झाल्याची माहिती आहे.

डॉ. अविनाश भोंडवे याबाबत बोलताना

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्याचे बोलले जात होते. ( Corona's Third Wave in Maharashtra ) राज्यात झपाट्याने रुग्णसंख्या वाढत होती. त्यातच आता ही रुग्ण संख्या जरी वाढत असली तरी धोका हा जास्ती नाही. तर दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क हा एकमेव उपाय असल्याचं तज्ञांकडून वारंवार सांगितलं जात होतं. मास्क वापरामुळे आपण कोरोना संसर्गाला ९५ टक्के टाळू शकतो, हे देखील सिद्ध झाले आहे. मात्र, आता कोरोनाची तिसरी लाट ओसरत असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य मास्क मुक्त करण्याचा विचार सरकार करत असल्याचं समोर आले आहे.

मास्क मुक्ती शक्य नाही - अविनाश भोंडवे

मास्क मुक्ती करण्याचा राज्य सरकारचा निर्णय हा अशास्त्रीय आणि अनाकलनीय आहे, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले आहे. हा निर्णय घेणं किंवा चर्चा करणे हे अत्यंत चुकीचं ठरू शकते, असेही ते म्हणाले. तसेच मास्क मुक्तीचा निर्णय भारतासारख्या देशात राष्ट्रीय पातळीवरच घ्यायला पाहिजे, असेही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा - India Corona Update : गेल्या 24 तासांत 2 लाख 35 हजार रुग्णांची नोंद

याआधी या देशांनी घेतला होता निर्णय -

दरम्यान काही महिन्यांपूर्वीच युरोप, इंग्लंड आणि फ्रान्ससह अनेक देशांनी मास्क न वापरण्यासंदर्भात निर्णय घेतले होते. मात्र, कालांतराने त्यांना हे निर्णय मागे घ्यावे लागले होते. आता राज्य सरकार जर हा निर्णय घेत असेल तर तो कितपत योग्य ठरू शकतो यावर चर्चा सुरू झाली आहे.

Last Updated : Jan 29, 2022, 11:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.