ETV Bharat / state

व्हेंटिलेटर ‘व्हेन सर्किट’ ठरणार कोविड रुग्णांना संजीवनी; बारामतीतील डॉक्टरांचे संशोधन

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. ठिकठिकाणी ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. शेकडो रुग्णांचे जीव गेले आहेत. यावर उपाय म्हणून बारामतीच्या डॉक्टरांनी एक यशस्वी संशोधन केले आहे. व्हेंटिलेटर वेळेत न मिळालेल्या कोरोना रुग्णांसाठी हे संशोधन संजीवनी ठरणार आहे.

Baramati Ven Circuit use
बारामती व्हेन सर्किट प्रणाली वापर
author img

By

Published : May 2, 2021, 8:58 AM IST

बारामती (पुणे) - सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. विविध ठिकाणी ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. यावर उपाय म्हणून बारामतीच्या डॉक्टरांनी एक यशस्वी संशोधन केले आहे. व्हेंटिलेटर वेळेत न मिळालेल्या कोरोना रुग्णांसाठी हे संशोधन संजीवनी ठरणार आहे. व्हेंटिलेटर ‘व्हेन सर्किट’ असे या प्रणालीचे नाव आहे.

बारामतीतील डॉक्टरांनी व्हेंटिलेटर ‘व्हेन सर्किट’ प्रणालीचा वापर सुरू केला

शहरातील डॉ. राहुल जाधव, डॉ. सुजित अडसुळ यांनी या प्रणालीचा वापर सुरू करत व्हेंटिलेटरला तात्पुरता पर्याय शोधला आहे. डॉ. राहुल जाधव यांनी बारामती शहरातील त्यांच्या रुग्णालयात या पर्यायाचा अवलंब करून कोविड रुग्णांवर उपचार केले आहेत. ही संकल्पना जुनी असून, भुलप्रक्रियेसाठी हे वापरतात. मधल्या काळात या संकल्पनेचा वापर बंद होता. ही संकल्पना सध्याच्या कोविड काळात वापरात आणून अनेकांचे प्राण वाचू शकतात.

केवळ १५ किलो ऑक्सिजनचा होतो वापर -

दोन रुग्णांवर या प्रणालीचा प्रयोग करण्यात आला. यामध्ये एका रुग्णाला व्हेंटीलेटर लावण्यात आला तर, दुसऱ्या रुग्णाला व्हेन सर्किट वापरण्यात आले. काही वेळानंतर दुसऱ्या रुग्णामध्ये व्हेंटिलेटर शिवाय ऑक्सिजन पातळीत वाढ झाल्याचे दिसून आले. व्हेंटीलेटरमधून रुग्णाला ३० ते ४० किलो ऑक्सिजनची गरज भासते तर, या प्रणालीत केवळ १५ किलो ऑक्सिजनचा वापर होतो. म्हणजेच ऑक्सिजनची यामध्ये मोठी बचत होते, अशी माहिती ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी दिली. हा पर्याय केवळ बारामती पूरताच मर्यादित राहू नये. सर्वत्र या पर्यायाचा अवलंब केला जावा, असेही ते म्हणाले.

ऑक्सिजन सॅच्युरेशन चांगले ठेवणे शक्य -

व्हेंटिलेटर ‘व्हेन सर्किट’ ही प्रणाली कोविड रुग्णांसाठी एकमेव पर्याय नाही. मात्र, व्हेंटीलेटर मिळेपर्यंत ही प्रणाली उपयुक्त ठरेल. डॉ. राहुल जाधव यांच्याकडे ही प्रणाली पाहिली. 'सिल्व्हर ज्युबीली' रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांवर त्याचा वापर केला. त्यामुळे संबंधित रुग्णाची ऑक्सिजन पातळी अवघ्या एक-दीड मिनिटात ९८ ते १०० पर्यंत वाढली. या माध्यमातून रुग्णांना ‘प्युअर ऑक्सिजन’ मिळतो. सध्याच्या काळात रुग्णसंख्या वाढत आहे. तुलनेने व्हेंटीलेटर बेड, ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने. या प्रणालीचा अवलंब करून रुग्णांचे ‘ऑक्सिजन सॅच्युरेशन’चांगले ठेवणे शक्य आहे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.