ETV Bharat / state

ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वांची दगडूशेठ गणपतीला मानवंदना

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले. ट्रस्टतर्फे दोन्ही अश्वांचे चांदीच्या हाराने पूजन करुन ते त्यांना प्रदान करण्यात आले.

ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वांची दगडूशेठ गणपतीला मानवंदना
author img

By

Published : Jun 23, 2019, 10:23 PM IST

पुणे - माऊली माऊली... गणपती बाप्पा मोरया... जय गणेश... च्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वानी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला थेट सभामंडपात येवून अनोखी मानवंदना दिली. सलग तिसऱया वर्षी माऊलींच्या मानाच्या अश्वांनी गणेश मंदिराच्या सभागृहात प्रवेश केला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त व पुणेकरांतर्फे अश्वांचे पूजन करण्यात आले.

ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वांची दगडूशेठ गणपतीला मानवंदना

कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या 2 अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले. ट्रस्टतर्फे दोन्ही अश्वांचे चांदीच्या हाराने पूजन करुन ते त्यांना प्रदान करण्यात आले.

माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट मागील 3 वर्षांपासून होत आहे. दरवर्षी सुमारे 300 किलोमीटरचा पायी प्रवास करुन हे अश्व वारीला जातात. तीन वर्षांपूर्वी या प्रवासात मंदिराबाहेरुन गणरायाचे दर्शन होत असे. परंतु, सलग तिसऱ्या वर्षी अश्वांनी गणरायासमोर सभामंडपात येवून मानवंदना दिली. गणेशाचे दर्शन घेऊन हे अश्व आता आळंदीकडे प्रस्थान करतील. आषाढी वारी ही शेतकऱ्यांची वारी आहे. त्यामुळे ज्यांना या वारीला येता येत नाही, ते या अश्वांचे दर्शन घेतात.

Intro:माऊली माऊली... गणपती बाप्पा मोरया... जय गणेश... च्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वानी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला थेट सभामंडपात जाऊन अनोखी मानवंदना दिली. सलग तिस-या वर्षी माऊलींच्या मानाच्या अश्वांनी गणेश मंदिराच्या सभागृहात प्रवेश केला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त व पुणेकरांतर्फे अश्वांचे पूजन केले. Body:कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले. ट्रस्टतर्फे दोन्ही अश्वांना चांदीचे हार पूजन करुन प्रदान करण्यात आले. Conclusion:माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट मागील तीन वर्षांपासून होत आहे. दरवर्षी सुमारे ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करुन हे अश्व वारीला जातात. तीन वर्षांपूर्वी या प्रवासात मंदिरा बाहेरुन गणरायाचे दर्शन होत असे. परंतु सलग तिस-या वर्षी अश्वांनी गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना दिली. गणेशाचे दर्शन घेऊन हे अश्व आता आळंदीकडे प्रस्थान करतील. आषाढी वारी ही शेतक-यांची वारी आहे. त्यामुळे ज्यांना या वारीला येता येत नाही, ते या अश्वांचे दर्शन घेतात.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.