पुणे : देहूतील तुकोबांच्या मंदिरापाठोपाठ आता आळंदीत देखील ज्ञानोबांच्या संजीवन समाधी मंदिरात मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने (Dnyaneshwar Maharaj Sansthan Committee Alandi) पत्रक काढले आहे. जेष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन देखील कमिटीकडून करण्यात आले आहे. परदेशात सुरू असलेल्या कोविडच्या पार्श्वभूमीवर त्यांनी खबरदारी घेतली (use mask In temple of dyanoba) आहे.
मास्क वापरण्याचे आवाहन : परदेशात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला (temple of dyanoba in Alandi) आहे. चीन, जपान आणि अमेरिकेसह इतर देशांमध्ये कोरोना झपाट्याने वाढत आहे. भारतात देखील कोरोनाचा संभाव्य संकट लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. हे लक्षात घेऊन देवाच्या आळंदीत ज्ञानेश्वर महाराज संस्थानकडून मुख्य मंदिरात येत असताना मास्क वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गर्दीत जाण्याच टाळावे आणि लहान मुले आणि जेष्ठांनी गर्दीत जाऊ नये, असे पत्रकात म्हटले आहे. मास्क सक्ती नसून केवळ आवाहन असल्याचे मंदिर प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले (Committee appeal to use mask) आहे.
कोरोना काळजी : होम आयसोलेशनसाठी कोरोना रुग्णांच्या घरी वेगळी आणि हवेशीर खोली असणे गरजेचे (Appeal To Use Mask) आहे. रुग्णासाठी वेगळे टॉयलेट असल्यास उत्तम ठरेल. रुग्णाची काळजी घेण्यासाठी २४ तास कोणीतरी उपलब्ध असायला हवे. लक्षात घ्या की, रुग्णांची लक्षणे सौम्य दिसत असतील तर हरकत नाही. पण गंभीर लक्षणे असल्यास त्वरीत रुग्णालयात दाखल करायला हवे. घरात राहून आपला ताप, ऑक्सिजनची पातळी वारंवार तपासत राहायला हवी. शरीराचे तापमान १०० फॉरेनहाईटपेक्षा जास्त नसावे. वारंवार पाणी पित राहणं उत्तम ठरेल. जर तुम्हाला इतर कोणतेही आजार असतील तर त्याच्याही गोळ्या वेळेवर घ्यायला हव्यात. मादक पदार्थांचे सेवन टाळायला हवं. डॉक्टरांच्या सल्ल्यानं नियमित औषध घ्यायला हवीत.
कोरोना रूग्णांसाठी आहार : कोरोना रुग्णांनी घरात तयार केलेले साधे जेवण घ्यायला हवे. संत्री, मोसंबी, बिया, डाळी अशा प्रोटिन्सयुक्त पदार्थांचे सेवन करायला हवे. डाळी, लसूण, हळद, मसाल्याचा आहारात समावेश असायला हवा. दिवसातून ८ ते १० ग्लास पाणी प्यायला हवं. कमी फॅट्सवाले पदार्थ, दूध, दही, यांचे सेवन करायला हवे. कोरोना रुग्णांनी कमी कॉलेस्ट्रॉल असलेल्या कमी तेलातील अन्न खायला हवे.