ETV Bharat / state

Diwali Shopping Of Irshalwadi Children : इर्शाळवाडीतील आपत्तीग्रस्त चिमुकल्या मुला-मुलींच्या चेहऱ्यावर दिवाळीच्या खरेदीमुळे फुलले अनोखे हास्य - Diwali Shopping Of Irshalwadi Children

Diwali Shopping Of Irshalwadi Children : इर्शाळवाडीच्या (Irshalwadi Tragedy) आपत्तीग्रस्त लहान मुला-मुलींना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, वंदे मातरम संघटनेचे वैभव वाघ तसंच पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर दिवाळीतील धमाल खरेदीची लयलूट केली. (Diwali 2023 in Irshalwadi) यावेळी त्यांनी धनत्रयोदशीच्या दिवशी इर्शाळवाडीतील आपत्तीग्रस्त चिमुकल्या मुला-मुलींच्या चेहऱ्यावर अनोखे हास्य फुलवले. (Dr Neelam Gorhe)

Diwali Shopping Of Irshalwadi Children
खरेदीचा आनंद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 10, 2023, 7:35 PM IST

इर्शाळवाडीतील चिमुकल्यांसोबत दिवाळी खरेदीचा आनंद द्विगुणित करताना डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे Diwali Shopping Of Irshalwadi Children : काही महिन्यांपूर्वी इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळून मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती. (Nana Bhangire) या दुर्घटनेत बचावलेल्या सर्व लहान चिमुकल्या मुला-मुलींना एकनाथ शिंदे फाऊंडेशन, वंदे मातरम् संघटना (Vande Mataram Organization), राष्ट्र प्रथम ट्रस्ट, युवा वाद्य पथक ट्रस्ट यांच्या पुढाकारातून पुण्यात आणून पुण्यातील दिवाळीची सहल आणि खरेदीची लयलूट करत चिमुकल्यांसमवेत दिवाळी साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे, डॉ. नीलम गोऱ्हे या सर्व लहानग्यांना नवीन पोशाख खरेदी करताना स्वतः उपस्थित होत्या. (Sandeep Singh Gill)

बच्चे कंपनीने लुटला खरेदीचा आनंद : शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांचे आयुष्य अंधकारमय झालेले आहे, अशा आपत्तीग्रस्त चिमुकल्यांना पुण्यात आणून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासारखा दिवाळीचा दुसरा आनंद असू शकत नाही. यावेळी चिमुकल्यांनी लक्ष्मी रस्त्यावर विविध प्रकारचे कपडे, मिठाई खरेदी करत खरेदीचा मनसोक्त आनंद घेतला. सर्वसामान्यांसारखी आपली दिवाळी साजरी होत असल्याचा आनंद या सर्व चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. दिवाळी अनोख्या पद्धतीनं साजरी होताना बघून अतिशय समाधान वाटत असल्याचं वंदे मातरम संघटनेचे वैभव वाघ यांनी सांगितलं.

'या' मान्यवरांची उपस्थिती: याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, वंदे मातरम संघटनेचे वैभव वाघ, सुदर्शना त्रिगुणाईत, शहर संघटक श्रीकांत पुजारी तसेच असंख्य शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री दीड तास चालत पोहोचले होते इर्शाळवाडीत : रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील इर्शाळवाडी येथे जुलै, 2023 मध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मदतकार्याला वेग देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः चालत घटनास्थळी जाण्याचा निर्णय घेतला. घटनास्थळी पोहचून त्यांनी प्रत्यक्ष मदतकार्याचा आढावा घेतला होता. या दुर्घटनेमध्ये 12 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा:

  1. Anandacha Shidha : दिवाळीतही सर्वसामान्य शिधापत्रिकाधारकांना 'आनंदाचा शिधा' वेळेवर नाहीच
  2. Dhanteras 2023: धनत्रयोदशीच्या निमित्ताने सुवर्णनगरी जळगाव ग्राहकांनी गजबजली; सोनं खरेदीसाठी चढाओढ
  3. Adulterated Paneer Seized : भेसळयुक्त पनीर साठा जप्त, दिवाळीच्या तोंडावर प्रशासनाची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.