ETV Bharat / state

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कार्तिकस्वामी मंदिरासह दिव्यांनी लखलखली स्मशानभूमी

राजगुरुनगर शहरातील पोलीस ठाण्याजवळ असलेल्या भिमानदी काठी असलेल्या खडकेश्वर गणेश मंदिर व कार्तीकीस्वामी मंदिर आणि त्यालगत असलेल्या स्मशानभूमीत पणत्या लावल्याने हा परिसर लक्ष लक्ष दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त या स्माशनभूमी व रस्त्यालगत दिव्यांनी सजविण्यात आले. त्यामुळे हा संपुर्ण परिसर डोळे दिपवून टाकत होता.

author img

By

Published : Nov 30, 2020, 7:00 AM IST

dipotsav-at-the-kartikswami-temple-and-the-cemetery-at-rajgurunagar-on-the-occasion-of-tripura-pournima
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कार्तिकस्वामी मंदिरासह दिव्यांनी लखलखली स्मशानभूमी

राजगुरुनगर (पुणे)- त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने राजगुरुनगर येथील कार्तिकस्वामी, सिद्धेश्वर मंदिर परिसरासह स्मशानभूमीत लावलेल्या लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाली. यामुळे नेहमीच अंधारात असणाऱ्या स्मशानभुमीत लखलखाट पहायला मिळाला. राजगुरुनगर शहरातील तरुण, तरुणी, महिलांनी सहभाग घेऊन त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला.

स्मशानात दिव्यांचा लखलखाट राजगुरुनगर शहरातील पोलीस ठाण्याजवळ असलेल्या भिमानदी काठी असलेल्या खडकेश्वर गणेश मंदिर व कार्तीकीस्वामी मंदिर आणि त्यालगत असलेल्या स्मशानभूमीत पणत्या लावल्याने हा परिसर लक्ष लक्ष दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला. नेहमीच आगीत जळणारे मृतदेह या स्माशनभूमीत जळताना नागरिक रोजच पाहत आहेत. मात्र, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त या स्माशनभुमी व रस्त्यालगत दिव्यांनी सजविण्यात आले. त्यामुळे हा संपुर्ण परिसर डोळे दिपवून टाकत होता.
गर्दी घटली

कार्तिकस्वामीचे राजगुरुनगर येथील मंदीर पुराणीक आहे. या मंदीराचा वेगळा इतिहास आहे. राजगुरुनगर येथे कार्तिकस्वामींच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील अनेक भागातून भाविक भक्त येतात. यात महिला भाविकांची संख्या मोठी असते. मात्र यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने भाविकांची गर्दी झाली नाही. वर्षातून एकदाच म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला महिलांना कार्तिकीस्वामींचे दर्शन मंदिरात जाऊन घेता येते. कार्तिकस्वामींचे वाहन मोर पक्षी असल्याने दर्शन घेताना मोरपिस कार्तिकस्वामींच्या पुढे ठेवल्यानंतर ते घरी घेवून जात होते. कार्तिकीला मोरपीस, रुद्राक्ष, कोहळा, तीळ वाहण्याची पंरपरा आहे. मोरपीस घरी नेल्यावर पुजा करुन ते जपुन ठेवले जाते.

त्रिपुरा पौर्णिमेची कथा

एका कथेनुसार विष्णुदेवांच्या वरानी उन्मत्त झालेल्या त्रिपूर नावाच्या बलाढ्य असुराचा शिवशंकरांनी कार्तिक पौर्णिमेला नाश केला होता. त्यावेळी श्री. क्षेत्र भिमाशंकर येथे त्रिपुरारीच्या त्रासातून मुक्त झालेल्या प्रजेने आनंद व्यक्त करण्यासाठी दिपोत्सव केला. ही घटना कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घडली होती. त्यामुळे आजच्या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात. त्रिपुरारी पौर्णिमेला घराघरात, परिसरात, मंदिरातील दीपमाळेत दिवे लावले जातात.

त्याचबरोबर, कथेनुसार तारकासूर नावाच्या असुराला ताराक्ष, कमलाक्ष व विद्युन्माली असे तीन पुत्र होते. तारकासुराच्या या तीन पुत्रांनी देवादिकांना छळण्यास सुरुवात केली. हा प्रकार असह्य झाल्याने महादेवांनी त्यांच्याशी संग्राम करून त्या तिन्ही पुत्रांचा, म्हणजे त्रिपुरांचा बिमोड केला. असूर शक्तीचा नाश झाल्यामुळे देवांनी दिपोत्सव केला. हिच परंपरा आजही तशीच सुरू आहे.

हेही वाचा - ५१ हजार दिव्यांच्या प्रकाशाने उजळले दगडूशेठ गणपती मंदिर, त्रिपुरारीनिमित्त खास आरास

हेही वाचा - पुणे : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री महालक्ष्मी मंदिरात 11 हजार पणत्यांचा 'दीपोत्सव'

राजगुरुनगर (पुणे)- त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने राजगुरुनगर येथील कार्तिकस्वामी, सिद्धेश्वर मंदिर परिसरासह स्मशानभूमीत लावलेल्या लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाली. यामुळे नेहमीच अंधारात असणाऱ्या स्मशानभुमीत लखलखाट पहायला मिळाला. राजगुरुनगर शहरातील तरुण, तरुणी, महिलांनी सहभाग घेऊन त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कार्तिकस्वामी मंदिरासह दिव्यांनी लखलखली स्मशानभूमी
स्मशानात दिव्यांचा लखलखाट राजगुरुनगर शहरातील पोलीस ठाण्याजवळ असलेल्या भिमानदी काठी असलेल्या खडकेश्वर गणेश मंदिर व कार्तीकीस्वामी मंदिर आणि त्यालगत असलेल्या स्मशानभूमीत पणत्या लावल्याने हा परिसर लक्ष लक्ष दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला. नेहमीच आगीत जळणारे मृतदेह या स्माशनभूमीत जळताना नागरिक रोजच पाहत आहेत. मात्र, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त या स्माशनभुमी व रस्त्यालगत दिव्यांनी सजविण्यात आले. त्यामुळे हा संपुर्ण परिसर डोळे दिपवून टाकत होता.गर्दी घटली

कार्तिकस्वामीचे राजगुरुनगर येथील मंदीर पुराणीक आहे. या मंदीराचा वेगळा इतिहास आहे. राजगुरुनगर येथे कार्तिकस्वामींच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील अनेक भागातून भाविक भक्त येतात. यात महिला भाविकांची संख्या मोठी असते. मात्र यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने भाविकांची गर्दी झाली नाही. वर्षातून एकदाच म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला महिलांना कार्तिकीस्वामींचे दर्शन मंदिरात जाऊन घेता येते. कार्तिकस्वामींचे वाहन मोर पक्षी असल्याने दर्शन घेताना मोरपिस कार्तिकस्वामींच्या पुढे ठेवल्यानंतर ते घरी घेवून जात होते. कार्तिकीला मोरपीस, रुद्राक्ष, कोहळा, तीळ वाहण्याची पंरपरा आहे. मोरपीस घरी नेल्यावर पुजा करुन ते जपुन ठेवले जाते.

त्रिपुरा पौर्णिमेची कथा

एका कथेनुसार विष्णुदेवांच्या वरानी उन्मत्त झालेल्या त्रिपूर नावाच्या बलाढ्य असुराचा शिवशंकरांनी कार्तिक पौर्णिमेला नाश केला होता. त्यावेळी श्री. क्षेत्र भिमाशंकर येथे त्रिपुरारीच्या त्रासातून मुक्त झालेल्या प्रजेने आनंद व्यक्त करण्यासाठी दिपोत्सव केला. ही घटना कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घडली होती. त्यामुळे आजच्या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात. त्रिपुरारी पौर्णिमेला घराघरात, परिसरात, मंदिरातील दीपमाळेत दिवे लावले जातात.

त्याचबरोबर, कथेनुसार तारकासूर नावाच्या असुराला ताराक्ष, कमलाक्ष व विद्युन्माली असे तीन पुत्र होते. तारकासुराच्या या तीन पुत्रांनी देवादिकांना छळण्यास सुरुवात केली. हा प्रकार असह्य झाल्याने महादेवांनी त्यांच्याशी संग्राम करून त्या तिन्ही पुत्रांचा, म्हणजे त्रिपुरांचा बिमोड केला. असूर शक्तीचा नाश झाल्यामुळे देवांनी दिपोत्सव केला. हिच परंपरा आजही तशीच सुरू आहे.

हेही वाचा - ५१ हजार दिव्यांच्या प्रकाशाने उजळले दगडूशेठ गणपती मंदिर, त्रिपुरारीनिमित्त खास आरास

हेही वाचा - पुणे : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री महालक्ष्मी मंदिरात 11 हजार पणत्यांचा 'दीपोत्सव'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.