पुणे - विविधरंगी पणत्यांसह दिव्यांची आकर्षक आरास, नानाविध फुलांची सजावट व विद्युत रोषणाईने उजळलेला श्री महालक्ष्मी मंदिराचे विलोभनीय दृश्य त्रिपुरारी पौर्णिमेला पाहायला मिळाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगलमय, धार्मिक वातावरणात तब्बल 11 हजार पणत्यांचा 'दीपोत्सव' मंदिरामध्ये साजरा करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यापासून मंदिर बंद ठेवण्यात आली होती. मात्र, पाडव्याच्या दिवशी मंदिरे खुली करण्यात आली. त्यानंतर आलेल्या त्रिपुरारी पौर्णिमेला आम्ही दरवर्षीप्रमाणे उत्साहाने शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून 'दीपोत्सव' साजरा करीत आहे. 'निरोगी भारत सशक्त भारत' होण्याकरीता देवीकडे प्रार्थना करीत असल्याचे मंदिराचे विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी यांनी सांगितले. श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट तसेच श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा- एक देश, एक निवडणूक : काय आहे घटनात्मक तरतूद, पहिल्यांदा कधी चर्चेत आला मुद्दा