ETV Bharat / state

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो, ग्रामपंचायतीच्या सर्व जागा लढवण्याची तयारी करा - वळसे-पाटील - दिलीप वळसे पाटील न्यूज

राज्य पातळीवर ग्रामपंचायत निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार किंवा नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पण आंबेगाव तालुक्यातील सर्व जागा लढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे आवाहन आंबेगाव विधानसभेचे आमदार व कामगार उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

dilip walse patil appealed to ncp workers get ready for contest all gram panchayat seats
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो, ग्रामपंचायतीच्या सर्व जागा लढवण्याची तयारी करा - वळसे-पाटील
author img

By

Published : Dec 21, 2020, 12:08 AM IST

आंबेगाव (पुणे) - राज्य पातळीवर ग्रामपंचायत निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार किंवा नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. ग्रामपंचायत निवडणुकीबाबत राज्यपातळीवर आघाडीचा जो निर्णय होईल, त्यानुसार गाव पातळीवर योग्य निर्णय घेऊ. मात्र तोपर्यंत आंबेगाव तालुक्यातील सर्व जागा लढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे आवाहनन आंबेगाव विधानसभेचे आमदार व कामगार उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

गटबाजी, मतभेद बाजूला ठेवून विरोधकांवर मात करा
ग्रामपंचायत निवडणूक होत असताना सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झालेले नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन गाव पातळीच्या निवडणुकीची तयारी करावी. गटबाजी व आपसातील मतभेद बाजूला ठेवून विरोधकांवर मात करण्याची जोरदार तयारी करण्याचे आवाहन कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांना केले. वळसे-पाटील आज मंचर येथे ग्रामपंचायत निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.

विरोधकांना फूट पाडण्याची संधी देऊ नका
गावपातळीवर लढत असताना तरुणांची आक्रमक भूमिका व ज्येष्ठांची कामाची पद्धत यामध्ये योग्य सुसंवाद घडवून निवडणुकीत एकत्रित येऊन एकजुटीने काम करावे. याबाबत विरोधकांना फूट पाडण्याची संधी देऊ नये. यासाठी पक्षाकडून निरीक्षक म्हणून दूध संघाचे चेअरमन विष्णू हिंगे यांची नेमणूक करण्यात आली आहे. यावेळी ज्येष्ठ नेते बाबुराव बांगर, वसंत भालेराव, कैलास काळे, भीमाशंकर साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडेपाटील, सभापती संजय गवारी, संतोष भोर व इतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा - ...त्यावर शरद पवार कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत - देवेंद्र फडणवीस

हेही वाचा - पुण्यात अनोखे रक्तदान शिबिर : मांसाहारी रक्तदात्याला 1 किलो चिकन आणि शाकाहारीला अर्धा किलो पनीर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.