ETV Bharat / state

Dhananjay Munde Demand : पुण्यातील 'या' स्टेडियमला शरद पवार यांचे नाव द्या - धनंजय मुंडेंची मागणी

author img

By

Published : Jun 16, 2023, 9:44 PM IST

पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव देण्याची मागणी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे. या संदर्भात धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांना पत्र दिले आहे.

Pune News
पुण्यातील स्टेडियमला खा.शरदचंद्र पवार यांचे नाव द्यावे

पुणे : पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानास बीसीसीआय व आयसीसीचे माजी अध्यक्ष, पद्मविभूषण खासदार शरद पवार यांचे नाव देण्याची मागणी, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांच्याकडे केली आहे. धनंजय मुंडे यांनी रोहित पवार यांना या संदर्भात एक पत्र लिहिले आहे. या पत्रात आयपीएलच्या धर्तीवर एमपीएल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तसेच आमदार रोहित पवार यांचे अभिनंदनही केले आहे.

शरद पवार यांचे महत्त्वपूर्ण योगदान : एमपीएल स्पर्धेत धनंजय मुंडे यांच्या मालकीचा छत्रपती संभाजी किंग्स हा मराठवाड्याचा संघ सहभागी झाला आहे. या संघाच्या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय त्याचबरोबर आयसीसीचे अध्यक्ष राहिलेल्या पद्मविभूषण खासदार शरद पवार यांचे क्रीडा विश्वात व विशेष करून क्रिकेटमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे.

मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान मोदी यांचे नाव : भारतीय महिला क्रिकेटला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देणे. देशासाठी खेळलेल्या निवृत्त क्रिकेटर्सला पेन्शन सुरू करणे यासारखे मोठे निर्णय पवार यांच्या कारकिर्दीत होऊ शकले, याचाही उल्लेख धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात केला आहे. गुजरातमधील मोटेरा स्टेडियमला ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले. त्याच धर्तीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मालकीच्या पुणे येथील गहुंजे स्टेडियमला खासदार शरद पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी आमदार रोहित पवार यांच्याकडे केली आहे. मराठवाड्याच्या छत्रपती संभाजी किंग्स या आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी धनंजय मुंडे हे स्वतः मैदानात पूर्णवेळ उपस्थित राहत आहेत.

असे आहे मोटेरा स्टेडियम : तर गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे मोटेरा स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्‌सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाते.

हेही वाचा -

  1. Ajit Pawar News राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या ४० समर्थकांचे पत्र सह्यानिशी तयार
  2. Sharad Pawar Threat Case शरद पवार यांना मारण्याची धमकी देणारा निघाला सॉफ्टवेअर इंजिनिअर मुंबई गुन्हे शाखेने केली अटक
  3. Sharad Pawar On Lok Sabha Election 2024 शरद पवारांचे टार्गेट लोकसभा निवडणूक 2024 पक्षातील या नेत्यांच्या खांद्यावर टाकली जबाबदारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.