पुणे - शिर्डीच्या सर्व भक्तांनी साईबाबांचा 'श्रद्धा आणि सबुरी' हा मंत्र जपावा. या मार्गानेच मार्ग निघणार आहे. पाथरीलाच साईबाबांचा जन्म झाला, हे आम्हाला लहानपणापासून माहिती आहे. आम्हाला तसेच शिकवण्यात आले आहे. मात्र, ज्याप्रकारे राधाकृष्ण विखे-पाटलांनी यामध्ये सहभाग घेऊन राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. तो राज्याला शोभणारा नाही, देवामध्ये राजकारण अयोग्य आहे, असे वक्तव्य सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
हेही वाचा - आंतरराष्ट्रीय विमानतळ काळाची गरज.. तसेच साईबाबा जन्मस्थळाच्या वादावर चर्तेतून तोडगा काढू -पवार
पुढे बोलताना ते म्हणाले, की साई भक्तांना वेठीस कुणीच धरू नये, बाबांच्या भक्तीने संपूर्ण देशातून भाविक मोठ्या श्रद्धेने येतात. मात्र, या भाविकांना आतापर्यंत शिर्डीत कधी त्रास झाला नाही, त्यामुळे असा त्रास पुढेही होऊ नये. त्यामुळे शिर्डीतल्या नागरिकांना माझी विनंती आहे, जन्मठिकाण वादामुळे भक्तांना अडचण निर्माण होईल, असे काही करु नये. याबाबत सरकारने, विरोधी पक्षांनी आणि नागरिकांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन मुंडे यांनी केले.