ETV Bharat / state

rupee Cooperative Bank : रुपी सहकारी बँक अवसायनात,धनंजय डोईफोडे यांची बँकेचे अवसायक पदी नियुक्ती - Reserve Bank of India

भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेच्या ( Reserve Bank of India ) आदेशानुसार रुपी सहकारी बँकेचा परवाना रद्द होऊन ती अवसायनात काढण्यात आली आहे. धनंजय डोईफोडे यांची बँकेचे अवसायक म्हणून सहकार आयुक्तांनी नियुक्ती केली आहे. बँकेचे प्रशासकीय मंडळ बरखास्त झाले आहे.

Rs Cooperative Bank
रुपी सहकारी बँक
author img

By

Published : Nov 2, 2022, 2:50 PM IST

पुणे : भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेच्या ( Reserve Bank of India ) आदेशानुसार रुपी सहकारी बँकेचा परवाना रद्द होऊन ती अवसायनात काढण्यात आली आहे. धनंजय डोईफोडे यांची बँकेचे अवसायक म्हणून सहकार आयुक्तांनी नियुक्ती केली आहे. बँकेचे प्रशासकीय मंडळ बरखास्त झाले आहे.

बँकिंग परवाना रद्द : रुपी बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्याचे आदेश रिझव्‍‌र्ह बँकेने ८ ऑगस्ट रोजी दिले ( rupee Cooperative Bank License canceled) होते. या आदेशाविरोधात बँकेने अर्थमंत्रालयाकडे दाद मागितली होती. मात्र, त्यावर सुनावणी होऊन केंद्रीय अर्थमंत्रालयाने बँकेची मागणी सोमवारी फेटाळली. त्यामुळे बँक अवसायनात काढण्यात आली असून, डोईफोडे यांची अवसायक म्हणून सहकार आयुक्त कवडे यांनी नियुक्ती केली ( rupee Cooperative Bank New Appointments ) आहे.

बँकेवर अवसायक नियुक्त : ‘‘बँकेवर अवसायक नियुक्त करण्यात आला आहे. पुढील सहा वर्षे बँकेवर अवसायक कार्यरत राहतील. आतापर्यंतच्या चौकशीत दोषी ठरलेल्यांकडून वसुली करण्याचे सर्वाधिकार अवसायकांना आहेत. नियमानुसार या वसुलीतून प्राधान्याने पाच लाखांच्या आत रक्कम असणाऱ्या ठेवीदारांचे पैसे परत केले जातील. त्यानंतर ठेव विमा महामंडळाचे पैसे दिले जातील आणि त्यानंतर पाच लाखांपुढील ठेवी असणाऱ्या खातेदारांचे पैसे परत करण्याची कार्यवाही केली जाईल.’’ असे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी सांगितले आहे.

बँकेचा संचित तोटा : बाजारभावाप्रमाणे 715 कोटी 18 लाख रुपये असून, बँकेची एकूण आर्थिक तरलता 805 कोटी 85 लाख रुपये आहे. बँकेचा संचित तोटा 612 कोटी 65 लाख असून, अनुत्पादित कर्जे 281 कोटी 97 लाख रुपये आहेत. त्यामुळे थकीत कर्जाच्या वसुलीतून राहिलेल्या ठेवीदारांच्या रकमा परत करणे आणि अवसायनाचे कामकाज जलदगतीने करण्यास प्राधान्य देणार आहे, अशी माहिती रुपी बँकेचे अवसायक धनंजय डोईफोडे यांनी दिली.

ठेव विमा महामंडळ : बँकेच्या आर्थिक स्थितीबद्दल ते म्हणा, ‘ठेव विमा महामंडळाने (डीआयसीजीसी) पाच लाखांपर्यंत परत केलेल्या ठेवींची रक्कम 700 कोटी असून, ठेवीदारांची संख्या 65 हजार इतकी आहे. विमासंरक्षित आहे परंतू अद्यापही परत न केलेल्या पाच लाखांपर्यंतच्या ठेवीदारांची संख्या 4 लाख 36 हजार 784 असून, रक्कम 222 कोटी 16 लाख रुपये आहे. तसेच विमासंरक्षण नसलेल्या व परत न केलेल्या 5 लाखांवरील ठेवीदारांची संख्या 3 हजार 798 असून, रक्कम 227 कोटी 56 लाख रुपये आहे.

चार वर्षांत 100 कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट : रुपी बँकेच्या एकूण 35 शाखा असून, सेवकसंख्या 212 आहे. ठेव विमा महामंडळाने विमासंरक्षणाखाली 700 कोटी 44 लाख रुपयांएवढी रक्कम बँकेच्या खात्यामध्ये जमा केली असून, ती रक्कम महामंडळास देय आहे. बँकेच्या स्वमालकीच्या एकूण नऊ इमारती असून, त्यांची बाजारभावाने किंमत 80 कोटी रुपये आहे. सप्टेंबर 2022 अखेरपर्यंत 5 कोटी 13 लाख रुपये वसुली झाली असून, येत्या 3 ते 4 वर्षांत एकूण वसुली 100 कोटींपर्यंत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.’ बँकेचे एकूण कर्जदार 1 हजार 647 आहेत. त्यापैकी अनुत्पादित कर्जदारसंख्या 1 हजार 375 आणि उत्पादित कर्जदार 272 असल्याचेही त्यांनी सांगितले.रुपी बँकेची 30 सप्टेंबर 2022 अखेरची आर्थिक स्थिती एकूण ठेवी 606.31 आहे, कर्जे 283.38 आहे, अनुत्पादित कर्जे 281.97 आहे, उत्पादित कर्जे 2.91 आहे, सप्टेंबरअखेर वसुली 5.13 आहे, सप्टेंबरअखेर नफा 13.75 आहे, संचित तोटा 612.65 आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.