खेड (पुणे) - तालुक्यातील धामणे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ७ वर्गखोल्यांचे छत वादळीवाऱ्याने उडाल्याची घटना घडली आहे. यामध्ये शाळेच्या वर्गखोल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, विस्तार रोहिदास रामाने, मुख्याध्यापक धर्मराज पवळे, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावातील तरुणांनी शाळेच्या उडालेल्या छताचे पत्रे व साहित्य एकत्र गोळा केले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून पुण्याच्या ग्रामीण भागात वाढलेल्या उकाड्याने लोकांना हैराण केले होते. मुसळधार पावसाची चिन्हे दिसत असताना रविवारी सायंकाळच्या सुमारास अचानक वादळीवारा सुरू झाला. यामध्ये शाळेच्या छताचे पत्रे आणि लोखंडी अँगल वाऱ्याने उडून गावाच्या वेगवेगळ्या भागात जाऊन पडले. यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. गावातील एका गाडीवर पत्रे पडल्यामुळे गाडीचे नुकसान झाले आहे.
गावाची शाळाच आपले ग्रामदैवत मानून ग्रामस्थ, ग्रामशिक्षण समिती आणि शिक्षकांच्या मेहनतीतून अतिशय स्वच्छ, सुंदर शाळा निर्माण केली होती. वादळीवाऱ्याने झालेल्या नुकसानीमुळे ७वीच्या वर्गातील शैक्षणिक साहित्य, संगणक संच, ५ एलईडी टीव्ही, शालेय पुस्तके, ब्लॅक बोर्ड व इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि तातडीने पंचनामा करण्याच्या सुचना दिल्या. शाळा दुरुस्तीसाठी तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शरद बुट्टे पाटील यांनी सांगितले आहे.
वादळीवाऱ्याने खेड तालुक्यातील धामणे शाळेचे छत उडाले; शालेय साहित्याचे नुकसान
रविवारी सांयकाळी वादळीवाऱ्याने धामणे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवरील छत उडून गेले. यामुळे वर्गातील शैक्षणिक साहित्याचे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी घटनास्थळाला भेट देत पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.