ETV Bharat / state

ललित पाटील प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची माहिती खोटी - सुषमा अंधारे

Sushma Andhare On Devendra Fadnavis : ललित पाटील प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी खोटी माहिती दिल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्या आज पुण्यात बोलत होत्या.

Sushma Andhare On Devendra Fadnavis
सुषमा अंधारे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 15, 2023, 6:52 PM IST

Updated : Dec 15, 2023, 8:13 PM IST

सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया

पुणे Sushma Andhare On Devendra Fadnavis : ललित पाटील प्रकरणी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून गांभीर्यानं विचार करण्याची गरज असल्याचं शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी वक्तव्य केलं आहे. त्या आज पुण्यात बोलत होत्या. या संदर्भात दोन दिवसांपूर्वी अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोटी माहिती दिली, ती दिशाभूल करणारी आहे, अशी टीका देखील अंधारे यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस शांतपणे खोटे बोलतात : फडणवीसांनी बोलताना ड्रग्जवर भाष्य केलं. नाशिकमध्ये ललित पाटील कोणाच्या आशीर्वादानं रॅकेट चालवत होता, हे समोर आलं पाहिजे. ललित पाटील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होता, असं त्यांनी बोलताना सांगितलं. मात्र, ते खोटं बोलत आहेत. फोटोत ललित पाटील दादा भुसे यांच्यासोबत दिसत आहेत. म्हणजे दादा भुसे ललित पाटीलला तिथं घेऊन आले, असं दिसतंय. यावर देवेंद्र फडणवीस अत्यंत शांतपणे खोटं बोलत असल्याची टीका अंधारे यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस गेल्या अधिवेशनात अनिल जयसिंघानी यांच्याबद्दल गोलमटोल बोलले होते. ललित पाटील प्रकरणातही तेच होत आहे. ससूनचे संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली, ही माहिती चुकीची आहे. कारण MAT प्रकरणामुळं संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. या सरकारनं केलेल्या कारवाईमुळं त्यांनी खुर्ची सोडलेली नाही, असं देखील अंधारे म्हणाल्या.

नीलम गोर्‍हे 'त्या' खुर्चीचा मान राखावा : उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी अधिवेशनात 'त्या' खुर्चीचा मान राखावा. योग्य माहिती मिळणं, तसंच ती सभागृहात देणं आवश्यक आहे. नीलम गोऱ्हे पुण्याच्या आहेत. त्यामुळं ससून हॉस्पिटलशी संबंधित ललित पाटीलची माहिती मिळू शकत नाही, असं म्हणत अंधारे यांनी नीलम गोर्‍हे यांच्यावर टीका केली आहे.

डॉ. संजय मरसाळे यांना जामीन कसा मिळाला : ललित पाटील प्रकरणात आज डॉक्टर संजय मरसाळे यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यांच्या नॉर्को चाचणीची मागणी केली असताना मरसाळे यांना जामीन कसा मिळतो?, असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा -

  1. ठाकरे गटाच्या नेत्याची मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत पार्टी, नितेश राणेंनी विधानसभेत दाखवले फोटो
  2. शिवसेना आमदार अपात्र प्रकरण; निर्णय घेण्यासाठी राहुल नार्वेकरांना मुदतवाढ, वाचा नवीन तारीख काय
  3. दिशा सालियन प्रकरणी 'का-कू' न करता शर्मिला ठाकरेंनी घेतली आदित्य ठाकरेंची बाजू, म्हणाल्या "तो असं काही करेल वाटत नाही"

Last Updated : Dec 15, 2023, 8:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.